हातकणंगलेतील शिक्षकांच्या कामाचा वेळेत निपटारा-गटशिक्षणाधिकाऱ्यांची पुरोगामीला ग्वाही
schedule24 Oct 24 person by visibility 155 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या कार्यालयीन कामांचा वेळीच निपटारा केला जाईल अशी ग्वाही नूतन गटशिक्षणाधिकारी आर. जी. चौगले यांनी महाराष्टि पुरोगामी शिक्षक संघटनेला दिली.
पुरोगामी शिक्षक संघटना, हातकणंगले शाखेतर्फे आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या हस्ते चौगले यांचा सत्कार झाला. गटशिक्षणाधिकारी चौगले म्हणाले, तालुक्यातील शिक्षक उपक्रमशील आहेत. शिक्षण क्षेत्रातील बदल स्विकारून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी सातत्याने प्रयत्नशील राहिल्यास तालुक्याची शैक्षणिक प्रगती वेगाने होईल.’ पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांनी शिक्षण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांस संघटनेचे सदैव सर्वोत्तम सहकार्य राहील असे सांगितले.
याप्रसंगी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस तुषार पाटील, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अशोक खाडे, महिला जिल्हा कोशाध्यक्षा प्रेरणा चौगुले, तालुका अध्यक्ष प्रभाकर चौगले, महिला अध्यक्षा संध्या महाजन आदी उपस्थित होते.