गुरुवारी शिक्षण परिषद- जागर पुरस्कार सोहळा : भरत रसाळे
schedule04 Nov 25 person by visibility 30 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्य वतीने गुरुवारी सहा नोव्हेंबर २०२५ रोजी शिक्षण परिषद आयोजित केली आहे. यामध्ये शिक्षण जागर पुरस्काराचे वितरण केले जाणार असल्याची माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी दिली. संघटनेतर्फे प्रत्येक वर्षी पाच ऑक्टोबर या जागतिक शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षण परिषद भरविले जाते. " चालू वर्षी शिक्षण परिषदेमध्ये "टीईटी सक्ती :अर्थ आणि अनर्थ " या विषयावर चर्चा केली जाणार आहे. परिषदेचे उद्घाटन विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते होणार आहे. शिक्षक आमदार प्रा. जयंत असगावकर कोल्हापूर विभागाच्या शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ . मीना शेंडकर, प्राचार्य प्रभाकर हेरवाडे व अखिल भारतीय प्रारंभिक शिक्षा महासंघाचे महासचिव सुधाकर सावंत हे आपले विचार मांडणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे हे आहेत. हा कार्यक्रम गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता राम गणेश गडकरी हॉल पेटाळा खरी कार्नर कोल्हापूर येथे होत आहे. संघटनेचे पदाधिकारी शिवाजी भोसले, महादेव डावरे , कुमार पाटील, सविता गिरी, चारुलता पाटील, मच्छिंद्र नाळे , आप्पासाहेब वागरे हे परिषद यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेत आहेत.