मार्केट यार्डात देवगड हापूसची आवक, एका डझनाचा दर ४२०० !
schedule04 Nov 25 person by visibility 43 categoryउद्योग
        महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (३ नोव्हेंबर २०२५) देवगड हापूस आंब्याची आवक झाली. सौद्यात एका डझनच्या आंबा बॉक्सला ४२०० रुपये दर मिळाला. यार्डातील फळ विभागातील जेबी अँड सन्स यांच्या दुकानात प्रकाश शिरसेकर यांच्या देवगड हापूस आंब्यांची आवक झाली. एका डझनाचे पाच बॉक्स होते. फळ व्यापारी आफान बागवान यांनी हे बॉक्स खरेदी केले. बाजार समितीचे सभापती सुर्यकांत पाटील यांच्या हस्ते सौदा झाला. यावेळी बाजार समितीचे उपसभापती राजाराम चव्हाण, संचालक सुयोग वाडकर, बाळासाहेब पाटील, पांडूरंग काशीद, नानासाहेब कांबळे, दिलीप पोवार, सचिव तानाजी दळवी, वसंत पाटील, अनिल पाटील, सोहेल बागवान, इरफान बागवान, शौकत बागवान, नईम बागवान उपस्थित होते.