डीवाय पाटील हॉस्पिटल संघांचा हॉस्पिटल प्रीमियर लीगमध्ये विजयी चौकार
schedule04 Nov 25 person by visibility 20 categoryक्रीडा
        महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरातील शास्त्रीनगर मैदानावर पार पडलेल्या हॉस्पिटल प्रीमियर लीग 2025 या तेराव्या पर्वात डी .वाय. पाटील हॉस्पिटल संघाने शानदार कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. या स्पर्धेत डी वाय पाटील हॉस्पिटल संघाचे हे चौथे विजेतेपद पद आहे. या स्पर्धेत एकूण आठ संघांनी अथायु हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल, डी वाय पी हॉस्पिटल, के स्टार स्पोर्ट्स, कोयना हॉस्पिटल, सिद्धगिरी हॉस्पिटल, सनराइज हॉस्पिटल आणि ट्युलिप हॉस्पिटल या आठ हॉस्पिटल संघांचा सहभाग होता.
पहिल्या उंपात्य लढतीत सिद्धगिरी हॉस्पिटलने ट्युलिप हॉस्पिटलवर 40 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. आकाश (22 चेंडू, 52 धावा) आणि तनिष पाटील (37 चेंडू, 77 धावा) यांच्या तडाखेबाज खेळीच्या जोरावर त्यांनी 150 धावांचा डोंगर उभा केला. दुसऱ्या उंपात्य फेरीमध्ये डी वाय पाटील हॉस्पिटलने अथायु हॉस्पिटलला पराभूत केले. ऋषिकेश पाटील (17 चेंडू, 25 धावा) आणि अमित गायकवाड (21चेंडू , 46 धावा) यांच्या झंझावाती फलंदाजीमुळे डी वाय पाटील संघाने एक चेंडू राखत 7 विकेटने विजय मिळवला.
डी वाय पाटील हॉस्पिटल आणि सिद्धगिरी हॉस्पिटल यांच्यात अंतिम सामना रंगला. *कर्णधार अजित पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली* खेळणाऱ्या डी. वाय. पाटील संघाकडून ऋषिकेश पाटील यांनी 32 चेंडूत 53 धावांची अर्धशतकीय खेळी करत संघाला मजबूत स्थितीत नेले. सुशांत यांनी 9 चेंडूत 22 धावा करत चांगली साथ दिली. सिद्धगिरी संघाकडून नवज्योत यांनी चार बळी घेतले. परंतु तनिष पाटील (37 धावा) आणि आकाश (27 नाबाद) यांचे प्रयत्न संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत आणि डी वाय पाटील हॉस्पिटलने 32 धावांनी विजय मिळवला.
स्पर्धेतील बेस्ट कॅच ऑफ द टूर्नामेंट मयूर पावसे, सर्वोत्तम गोलंदाज आकाश नीलगर (10 विकेट्स), बेस्ट बॅट्समनचा डॉ. ऋषिकेश पाटील तर मालिकावीर (सायकल पुरस्कार) तनिष पाटील यांना मिळाला. डी वाय पाटील हॉस्पिटल संघाने केलेल्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, उपअधिष्ठाता डॉ. पद्मजा देसाई, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, उपकुलसचिव संजय जाधव, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील यांनी अभिनंदन केले आहे.