+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमहाराष्ट्र दिल्लीपुढे झुकत नाही हे शाहू महाराजांनी दाखवून दिले-कपिल पाटील adjust आमदार प्रकाश आवाडे निवडणूक लढवणार, हातकणंगलेत अपक्ष उमेदवारी adjustगोकुळमार्फत सतेज पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा adjustशिक्षक बँकेतील राजकारणाचे कवित्व ! एकमेकांच्या कामकाजाचा पर्दाफाश ! adjustगोकुळच्या दूध विक्रीचा नवा उच्चांक ! दिवसभरात २२ लाख ३१ हजार लिटर दूध विक्री adjustरोटरी गार्गीजतर्फे सोळा एप्रिलला भरतनाट्यम कार्यक्रम adjustसभेच्या मान्यतेने अमृत संजीवनी योजना, विक्रमी नफ्यामुळे विरोधकांना पोटशूळ- अध्यक्ष राजेंद्र पाटील adjustनिवडणुकीचा मांडव आपल्या दारात; तिन्ही गटांचा समन्वय ठेवा-हसन मुश्रीफ adjustशक्तिपीठ महामार्ग धनदांडग्यासाठी, शेतकऱ्यांची बैलगाडी त्यावर धावणार का ? - संजय घाटगे adjustटेंबलाईवाडी विद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता दर्जेदार - जिल्हाधिकारीसो अमोल येडगे
Screenshot_20240226_195247~2
schedule24 Mar 24 person by visibility 97 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर  ::
संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने कोल्हापूर महानगरपालिका स्मशानभूमीस तीन लाख शेणीदान करण्यात आल्या . फुलेवाडी रिंग रोड नवीन वाशी नाका परिसरात झालेल्या कार्यक्रमात श्रीमंत शाहू छत्रपती, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना शाहू महाराज म्हणाले, संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीने शेणीदान उपक्रमात २०१७ पासून सातत्य ठेवले आहे. सामाजिक कामात सातत्य आवश्यक असते हे काम या मंडळांनी केले आहे त्यामुळे ते इतरांना निश्चितपणे प्रेरणादायी आहे. गेल्या सात वर्षात १५ लाख शेणीदान केल्याबद्दल समितीचे त्यांनी कौतुक केले.
आमदार ऋतुराज पाटील यांनी उत्सव समितीच्या सामाजिक कार्याबद्दल अभिनंदन केले. चार दिवसापूर्वी गरीब वॉचमनची झोपडी जळून खाक झाल्यानंतर उत्सव समितीने वाॅचमनचे कुटुंब पुन्हा उभारावे यासाठी केलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी महानगरपालिका सहाय्यक आयुक्त संतोष पाटील, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, राहुल माने, दुर्वास कदम, दिग्विजय मगदूम उपस्थित होते. 
या कार्यक्रमाचे आयोजन उत्सव समितीचे अध्यक्ष गणपतराव मुळीक, विजय आवटे, धनंजय भोंगाळे, रवींद्र भवड, उन्मेश जेरे, राम पाटील, उत्तम निगडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी केले.