तेरा वयोगट जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेस प्रारंभ,मानांकित आघाडीवर
schedule19 Sep 22 person by visibility 420 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने केन चेस अकेडमीतर्फे व लायन्स क्लब इचलकरंजीच्या सहकार्याने तेरा वयोगट जिल्हा बुध्दिबळ स्पर्धेला इचलकरंजी दाते मळा येथील लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी सभागृहात सुरूवात झाली.
स्पर्धेचे उद्घाटन लायन्स क्लबचे कृष्णा भराडिया, लक्ष्मीकांत भट्टड यांच्या हस्ते पटावरील चाल खेळून करण्यात आले. यावेळी केनचे प्रोप्रायटर निकुंज बगडीया, जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले , कुमार भंडारी, नवीन जैन,शैलेंद्र जैन उपस्थित होते. रोहित पोळ यांनी प्रास्ताविक केले. अस्मिता नलवडे यांनी आभार मानले.
या स्पर्धेला जिल्हयातील कोल्हापूर शहर, गडहिंग्लज, जयसिंगपूर, वडगाव, इचलकरंजी आदि शहरातील तेरा वर्षाखालील गटात ८४ मुले , २७ मुली असे १११ खेळाडू सहभागी झाले आहेत.
तेरा वर्षाखालील मुलांच्या गटात अग्रमानांकित रिय्यार्थ पोदार, शौर्य बगाडिया,अभय भोसले, वेंकटेश खाडे-पाटील, अथर्व तावरे, हीत बल्दवा, विवान सोनी हे मानांकित खेळाडू तर मुलीमध्ये अग्रमानांकित दिव्या पाटील दिशा पाटील, महिमा शिर्के,संस्कृती सुतार या मानांकिताचा समावेश आहे.
तेरा वर्षाखालील मुलांच्या गटात पाचव्या फेरीत अभय भोसले , शौर्य बगडिया, विवान सोनी तर मुलींच्या गटात तिस-या फेरीत दिव्या पाटील, दिशा पाटील, संस्कृती सुतार व प्रियदर्शनी ठोमके यांनी आपल्या प्रतिस्पर्धावर विजय मिळवत आघाडी घेतली. हीत बल्दवा व वेकेंटेश खाडे पाटील यांच्यात बरोबरी झाली. स्पर्धेचे पंच म्हणून मुख्य पंच करण परिट, रोहित पोळ, शंकर आडम, सुमित कांबळे, अस्मिता नलवडे,सहाय्यक म्हणून आंतरराष्ट्रीय खेळाडू संमेद पाटील, कृष्णा भराडिया काम पाहत आहेत.