Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
माहिती विभागाचे छायाचित्रकार अनिल यमकरांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार सतेज पाटील समर्थक प्रदीप झांबरेंचा भाजपमध्ये प्रवेश ! मुडशिंगीत काँग्रेसला धक्का !!सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री महापालिकेसाठी महायुतीचा पद वाटपाचा फॉर्म्युला ठरला ! रविवारी अधिकृत घोषणा !!युवक - युवतींसाठी काम, महिला सक्षमीकरणाला प्राधान्य : शिवसेनेचे उमेदवार सचिन पाटीलशिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी भली मोठी रांग ! कुलगुरू. आजी-माजी प्रकुलगुरु, अधिष्ठातांचा समावेश ! ! समूहभाव -सहानुभाव हे खेडयांचे मूलतत्व, मात्र संवेदनाशून्य नव मध्यमवर्गाला हा गावगाडाच समजला नाही : राजन गवसऔषध निर्मिती प्रक्रियेमध्ये प्रायोगिक प्राण्यांची योग्य हाताळणी गरजेची - डॉ. एम. व्यंकट रमणान्यू कॉलेजमध्ये संख्याशास्त्र विभागामार्फत स्टॅटस्पार्क 2026 चे आयोजनस्वयंप्रेरिकातर्फे चार दिवसीय खाजा-पिजा-लेजा प्रदर्शन

जाहिरात

 

शिक्षकाची मुलगी करतेय खेळात करिअर, दानोळीच्या साक्षी एडकेला खेलो इंडिया स्पर्धेत पदक

schedule29 Nov 25 person by visibility 337 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पाचवीत शिकत असताना तिला खेळाविषयी आवड निर्माण झाली. शाळेतील अनेक विद्यार्थी धनुर्विद्या खेळायचे. आपसूकच त्या खेळाडूंचा खेळ पाहून ती ही धनुर्विद्याकडे आकर्षित झाली. हळूहळू खेळात रुची निर्माण झाली. दहावीनंतर तिने ठरविलं की आपण खेळातच करिअर करायचं. कुटुंबीयांचे प्रोत्साहन, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि एकाग्रता, चिकाटी व संयम या साऱ्याचा मिलाफ घडवित धनुर्विद्येच्या विविध स्पर्धा तिनं गाजविल्या. राष्ट्र्रीय स्पर्धेत दोन वेळेला महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करताना एकदा सुवर्णपदकही जिंकलं आणि आता राजस्थान येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स २०२५ मध्ये ब्राँझ पदक जिंकत पुन्हा एकदा या खेळातील नैपुण्य दाखविलं. खेलो इंडिया स्पर्धा अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेमधील जे पहिले आठ संघ असतात त्यांच्यामध्ये होते. वेगळा खेळ प्रकार निवडत, राष्ट्रीय आणि खेलो इंडिया स्पर्धेत छाप उमटविणारी ही तरुण खेळाडू आहे, साक्षी सुनील एडके ! प्राथमिक शिक्षकाच्या या मुलीने करिअरसाठी वेगळा प्रांत निवडत ध्येयाकडे वाटचाल करत आहे.

 साक्षी ही शिरोळ तालुक्यातील दानोळी येथील. खेळावर पूर्ण लक्ष केंद्रित केलेल्या साक्षीला धनुर्विद्येत मोठया स्पर्धा जिंकायच्या आहेत. यासाठी तिची कसून तयारी सुरू आहे. सध्या बीएसस्सी तृतीय वर्षात शिकतेय. अहिल्यानगर येथील नेवासे येथील घाटगे महाविद्यालयात तिने प्रवेश घेतला आहे. क्रीडा प्रशिक्षक अभिजीत दळवी, शुभांगी दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतेय. धनुर्विद्या हा खेळ तीन प्रकारात आहे. इंडियन, रिकव्हर आणि कंपाऊंड. दरम्यान धनुर्विद्येतील इंडियन हा खेळ प्रकार ऑलिम्पिंक खेळात समाविष्ठ नाहीत. म्हणून साक्षी ही धनुर्विद्येतील रिकव्हर प्रकारात खेळतेय. सत्तर मीटर अंतरावरील निशाणा साधण्याचा हा खेळ. यासाठी एकाग्रता, संयम महत्वाचा. खेळात सातत्य आणि चिकाटी अत्यावश्यक.

धनुर्विद्या खेळाची आवड, तिच्यातील कौशल्य याविषयी सांगताना साक्षीचे वडील व प्राथमिक शिक्षक सुनील एडके म्हणाले, ‘दानोळी येथे धनुर्विद्या खेळाची परंपरा आहे. गावातील अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारलीय. साक्षीचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले. शाळेत, पहिल्या पाच हुशार विद्यार्थ्यांमध्ये तिचा समावेश होता. पाचवीसाठी तिनं दानोळी हायस्कूल दानोळी येथे प्रवेश घेतला. या कालावधीत तिला खेळाविषयी आवड निर्माण झाली. दानोळी हायस्कूलच्या असंख्य विद्यार्थ्यांनी धनुर्विद्या खेळ प्रकार गाजविला. शाळेतील खेळाडूंचा खेळ पाहून साक्षी धनुर्विद्याकडे आकर्षित झाली. क्रीडा मार्गदर्शक उदय भोसले यांचे तिला मार्गदर्शन लाभले. चढत्या इयत्तेनुसार तिची या खेळातील आवड वाढत गेली. दहावीनंतर तिने या खेळातच करिअर करायचं ठरविलं.’ शिक्षक एडके हे दि प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक आहेत. बँकेचे चेअरमन म्हणून त्यांनी काम केले आहे. मुलगीने खेळात करिअर करायचं निश्चित केल्यानंतर एडके कुटुंबीयांने तिला सर्वार्थाने प्रोत्साहन दिले आहे.

धनुर्विद्या खेळ प्रकारात अचूकता महत्वाची. यासाठी संयम, एकाग्रता आवश्यक. हा वैयक्तिक खेळ प्रकार आहे. साधारणपणे साडे तीन ते चार किलो वजनाचे धनुष्य असते. मात्र ७० मीटरवरील निशाणा साधण्यासाठी हा धनुष्य खेचताना वीस किलो वजनाइतकी ताकत एकवटावी लागते. हा वेगळा खेळ प्रकार साक्षी सध्या गाजवित आहे. भविष्यात तिला राष्ट्रकूल, ऑलिम्पिंक स्पर्धा खेळायच्या आहेत. या स्पर्धेसाठी पात्र ठरण्यासाठी तिची तयारी सुरू आहे. दरम्यान राजस्थान मधील एकूण सात शहरांमध्ये पाचव्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स २०२५ सुरू  आहे. यामध्ये विविध खेळ प्रकारात भारतातील २०० विद्यापीठामधून पाच हजाराहून अधिक खेळाडू सहभागी आहेत. स्पर्धेत एकूण २३ क्रीडा प्रकार व एक प्रायोगिक तत्त्वावर खो-खो हा खेळ असे एकूण २४ खेळांची स्पर्धा आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes