+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustअधिकाऱ्यांची संकल्पना, जिल्ह्याच्या वैशिष्ट्यांवर मतदान केंद्रांची स्थापना ! adjustलोकराजाला करवीरच्या जनतेकडून अभिवादन ! adjustजैन मठात दहा मेला महामस्तकाभिषेक महोत्सव adjustविधानसभेला मुश्रीफ की समरजितराजेसोबत राहणार ? मालोजीराजेंचा मंडलिकांना थेट सवाल adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात
Screenshot_20240226_195247~2
schedule27 Sep 23 person by visibility 379 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सासू-सुनेवर मराठीत असंख्य चित्रपट आहेेत. पण सासू आणि जावयाच्या धमाल नात्याचं चित्रण सासूबाई जोरात या चित्रपटात करण्यात आलं आहे. सिद्धार्थ प्रभाकर ढगे यांनी लेखन-दिग्दर्शन केलेला  हा चित्रपट २९ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 
प्रभू शांती फिल्म प्रॉडक्शननं "सासूबाई जोरात" हा चित्रपट प्रस्तुत केला आहे. तेजस काळोखे यांनी संगीत, कुमार डोंगरे यांनी छायांकन केलं आहे. चित्रपटात सयाजी शिंदे, संदीप पाठक, विजय पाटकर, मोहन जोशी, सुनील गोडबोले, उषा नाईक, आशा बिराजदार, विधी कुडिया, सिमरन क्षीरसागर, मिलिंद ढगे, सुयश लातूरे आदींच्या प्रमुख भूमिका आहेत. 
"सासुबाई जोरात" ही गोष्ट आहे आधुनिक सासू आणि तिच्या आधुनिक जावयाची. या सासूला तिच्या नवऱ्याचीही चिंता नाही. त्याशिवाय ती जावयाशीही अत्यंत कठोरपणे वागते. या सासू आणि जावई यांच्यात काय होतं याची धमाल गोष्ट सासूबाई जोरात या चित्रपटात मांडण्यात आली आहे. त्यामुळे सासू-सुनेच्या अनेक प्रकारच्या लढाया आजवर चित्रपट मालिकांतून पाहिल्यानंतर आता सासु-जावयाची धमाल गोष्ट चित्रपटात पाहणं हा मनोरंजक अनुभव ठरेल यात शंकाच नाही. त्याशिवाय चित्रपटात उत्तम स्टारकास्ट असल्यानं हा चित्रपट अभिनयाची मेजवानीच ठरेल.