Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सचिन पाटलांच्या उमेदवारीला मिळतेय मतदारांची पसंती, तरुण नेतृत्वात विकासकामाची धडाडीहाऊसफुल्ल गर्दीत दालनचा समारोप ! १०० फ्लॅट, ५० प्लॉटसाठी बुकिंग! लिफ्ट पार्किंगची नोंदणी !!मेरी वेदर मैदानावर तेरा फेब्रुवारीपासून भीमा कृषी प्रदर्शनमहापौर-उपमहापौरपदाचे उमेदवार ठरले !  सभागृहात महायुतीच्या विरोधात काँग्रेस लढणार! !काँग्रेस लढणार महापौर- उपमहापौरपदाची निवडणूक ! सचिन शेंडे, दुर्वास कदम उमेदवार !!शिक्षणाचा कोल्हापूर मनपा पॅटर्न राज्यात भारी ! शिष्यवृत्तीची रक्कम पाच हजार करणारी एकमेव महापालिक!!रुपाराणी निकम होणार कोल्हापूरच्या महापौर, आज दुपारी अर्ज भरणार ! मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा बांधकाम क्षेत्रातही पुढील तीस वर्षात एआयचे परिणाम जाणवणार – आयटीतज्ज्ञ अच्युत गोडबोलेसचिनच्या प्रचारार्थ आबाजींचा झंझावात! मतदारांत विश्वास…कार्यकर्त्यांत उत्साह ! !दालन प्रदर्शन पाहण्यास गर्दी उसळली…प्रार्थना बेहरेंनी साधला संवाद

जाहिरात

 

मेरी वेदर मैदानावर तेरा फेब्रुवारीपासून भीमा कृषी प्रदर्शन

schedule03 Feb 26 person by visibility 14 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कृषी क्षेत्रांशी निगडीत अद्ययावत माहिती एकाच छताखाली नागरिकांना मिळावी यासाठी तेरा ते सोळा फेब्रुवारी २०२६ या कालावधीत भीमा कृषी प्रदर्शन आयोजित केले आहे. येथलील मेरी वेदर मैदान येथे प्रदर्शन होणार आहे. या प्रदर्शनादरम्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन, विविध पुरस्कारांचा वितरण सोहळा आयोजित केला आहे अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रदर्शनाचे यंदा १८ वे वर्ष आहे.

या प्रदर्शनात कृषी क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, नवीन पीक पद्धतीं यासंबंधी मार्गदर्शन सत्रे होणार आहेत. यंदाच्या प्रदर्शनाची वैशिष्ट्ये सांगताना खासदार महाडिक म्हणाले, ‘पाच फुटाचा सरडा, बैलगाडा शर्यतीमधील हरण्या बैल्, बारा लाखांचे खिल्लार बैल, १४०० किलो वजनाचा मुऱ्हा रेडा, ३० लिटर दूध देणारी गाय ही आकर्षणे आहेत. प्रदर्शनात जातीवंत घोडे, शेळया, मेंढया, विविध जातीच्या कोंबडया, पक्षी  पाहावयास मिळतील. प्रदर्शन कालावधीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

 प्रदर्शनात शेतीभूषण पुरस्कार, शेतीनिष्ठ पुरस्का, जिजामाता पुरस्कार, आदर्श शेतकरी पुरस्कार दिले जाणार आहेत.पत्रकार परिषदेला पृथ्वीराज महाडिक, जिल्हा कृषी अधीक्षक महेश मास्तोळी, नामदेव परीट, डॉ. अजित शिंदे, डॉ. सुनील काटकर, सर्जेराव धनवडे, अशोक सिद्धनेर्ले, इंद्रजीत जाधव, कृषी अधिकारी युवराज पाटील, किरण रणदिवे आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes