Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूरच्या विकासासाठी महापालिका- कोल्हापूर फर्स्ट एकत्र काम करणारवडणग्याचं पोरगं : आत्मकथनातून उलगडला संघर्ष-समाजभान-मूल्यनिष्ठेचा प्रवासकोल्हापूरच्या मातीने मला संस्कार दिले, पुरस्काराने मातीचे ऋण फेडण्याची जाणीव - गायिका श्रृती सडोलीकर - काटकरआमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी विविध उपक्रमरामशेठ ठाकुरांनी दिली श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसला पंचवीस लाखाची देणगीमहात्मा फुलेंचा सार्वजनिक सत्यधर्म हा मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा - प्राचार्य जी. पी. माळीजिल्हातंर्गत काँग्रेसमध्ये होणार फेरबदल, पदाधिकारी नेमणुकीसंदर्भात आढावा बैठकडॉ. बापूजी साळुंखे  इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये उलगडली भारतीय वायुदलातील करिअरची संधी  घोडावत ऑलिम्पियाड स्कूलचे डॉ.होमी भाभा परीक्षेत यशसक्तीच्या टीईटी परीक्षेतून सवलत मिळण्यासाठी खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार - खासदार धैर्यशील माने

जाहिरात

 

कोल्हापूरच्या मातीने मला संस्कार दिले, पुरस्काराने मातीचे ऋण फेडण्याची जाणीव - गायिका श्रृती सडोलीकर - काटकर

schedule12 Apr 26 person by visibility 7 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘कोल्हापुरातच मी गायन शिकले, हे माझं माहेर आहे. इथल्या मातीने मला संस्कार दिले. सरदार आबासाहेब मुजुमदार यांच्या स्मृती जपणाऱ्या ‘रसिकराज’पुरस्कारात माहेचा आनंद दडलेला आहे. या पुरस्काराने मला प्रोत्साहन लाभले. तसेच गायन कलेतील जबाबदारी, पाय जमिनीवर ठेवण्याची  व मातीचे ऋण फेडण्याची जाणीव करुन दिली’ असे भावोत्कट उद्गगार प्रसिद्ध गायिका श्रृती सडोलीकर - काटकर यांनी काढले.

 गायन समाज देवल क्लब व मुजुमदार परिवार यांच्यावतीने देण्यात येणारा ’रसिकराज’पुरस्कार श्रृती सडोलीकर यांना प्रदान करण्यात आला. रिझर्व्ह बँकेच्या माजी डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले. स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. गायन क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.  गायन समाज देवल क्लबचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

उषा थोरात म्हणाल्या, ‘ आबासाहेब मुजुमदार यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा हा पुरस्कार नव्या पिढीला प्रेरणादायी आहे. मुजुमदार परिवाराने, त्यांच्या संगीतविषयक साहित्य, साधनांची जपणूक केली. मुळातच कोल्हापूरला कलेचा मोठा वारस लाभला आहे. गायन समाज देवल क्लबसारख्या संस्था कला व गायन क्षेत्राची जपणूक करत आहेत’ श्रीकांत डिग्रजकर यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी विनोद डिग्रजकर, डॉ. आशुतोष देशपांडे, राजेंद्र पित्रे व मुजुमदार परिवारातील सदस्य उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes