Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
हितैशी समुपदेशन केंद्र समाजासाठी सहाय्यभूत ठरेल – मंत्री चंद्रकांत पाटीलसीआयआय -अ‍ॅग्री इनोव्हेशन समिट उत्साहात,  डीवाय पाटील कृषी - तंत्र विद्यापीठात आयोजन गोकुळसाठी महायुतीच्या नेत्यांचे ठरले ! छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी जाहीर!!राज्याला आदर्शवत भाडेदराचे रोल मॉडेल तयार करा : आमदार राजेश क्षीरसागरसोशल मीडियावर गोकुळची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, कर्मचाऱ्यांची मागणी महापालिकेत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमधून ७० कर्मचाऱ्यांची मुकादमपदी पदोन्नतीआयकर कायदा २०२५ च्या नव्या पर्वाचे ‘पुनर्मंथन’ कोल्हापुरात, शनिवारी - रविवारी राष्ट्रीय परिषदराष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी टास्क फोर्सची स्थापना, नऊ सदस्यीय समितीत कुलगुरू डॉ. आर. के. कामतचप्पल निर्मितीची प्रक्रिया उलगडणाऱ्या ‘द कोल्हापुरी’ पुस्तकाला अकरा पुरस्कार मेघराज भोसले यांच्या समर्थ पॅनेल विरोधात चित्रकर्मी पॅनेल, अपक्षांची संख्याही मोठी

जाहिरात

 

जिल्हातंर्गत काँग्रेसमध्ये होणार फेरबदल, पदाधिकारी नेमणुकीसंदर्भात आढावा बैठक

schedule11 Apr 26 person by visibility 148 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तसेच कोल्हापूर शहर आणि  इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीमध्ये नवीन पदाधिकारी नेमणुकी संदर्भात काँग्रेस पक्षाच्यावतीने आढावा बैठका घेण्यात येणार आहेत. संघटन सृजन अभियाना अंतर्गत या बैठका दिनांक तेरा ते अठरा एप्रिल २०२६ या कालावधीत ज्या त्या तालुक्यात घेण्यात येणार आहेत. या अभियानात काँग्रेसचे सर्व तालुकाध्यक्ष, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह काँग्रेस पक्षासोबत जोडले जाण्याची इच्छा असणाऱ्या सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केले आहे.

अखिल भारतीय काँग्रेस समितीच्यावतीने संघटन सृजन अभियान राबवण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तसेच कोल्हापूर शहर आणि इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटी मध्ये नवीन पदाधिकारी नेमणुकी संदर्भात काँग्रेस पक्षाच्यावतीने आढावा बैठका घेण्यात येणार आहेत. खासदार शाहू महाराज छत्रपती आणि काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठका होतील. या आढावा बैठकांना पक्षातर्फे  मुख्य निरीक्षक जय शंकर पाठक यांच्या समवेत कोल्हापूर ग्रामीण साठी सहनिरीक्षक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस  सचिन सावंत ,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव नंदकुमार कुंभार, कोल्हापूर शहरसाठी राहुल गायकवाड, चंद्रपूरच्या खासदार  प्रतिभा धानोरकर , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव  सुनील मलके आणि राहुल वरदा उपस्थित राहणार आहेत. या अभियानात काँग्रेसचे सर्व तालुकाध्यक्ष, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह काँग्रेस पक्षासोबत जोडले जाण्याची इच्छा असणाऱ्या सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes