घोडावत ऑलिम्पियाड स्कूलचे डॉ.होमी भाभा परीक्षेत यश
schedule11 Apr 26 person by visibility 181 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मुंबई सायन्स टिचर्स असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरावर घेण्यात आलेल्या डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेमध्ये संजय घोडावत ऑलिम्पियाड स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत, तब्बल दहा पदके जिंकली. यामध्ये तीन सुवर्ण, पाच रौप्य आणि दोन कांस्य पदकांचा समावेश आहे. आर्यन प्रसन्न पवार, आध्या पुशान चिकली, आदित्य अभिजीत जाधव यांनी सुवर्णपदक पटकावले. रौप्य पदक प्राप्त करणाऱ्यांमध्ये ऐशना श्रीराम कुलकर्णी, अर्जुन विनायक बरगाले, समृद्धी रामदास बडे, चिरायू उमेश माने, शार्दुल सुश्रुत कुलकर्णी यांचा तर कांस्यपदक प्राप्त करणाऱ्यांमध्ये साची सुहास वाडकर, रुद्रराज सुरेश जाधव या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना या संस्थेचे झोनल हेड प्रभु श्रीनिवास यांचे मार्गदर्शन लाभले. चेअरमन संजय घोडावत व विश्वस्त विनायक भोसले यांनी अभिनंदन केले आहे.