Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूरच्या विकासासाठी महापालिका- कोल्हापूर फर्स्ट एकत्र काम करणारवडणग्याचं पोरगं : आत्मकथनातून उलगडला संघर्ष-समाजभान-मूल्यनिष्ठेचा प्रवासकोल्हापूरच्या मातीने मला संस्कार दिले, पुरस्काराने मातीचे ऋण फेडण्याची जाणीव - गायिका श्रृती सडोलीकर - काटकरआमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी विविध उपक्रमरामशेठ ठाकुरांनी दिली श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसला पंचवीस लाखाची देणगीमहात्मा फुलेंचा सार्वजनिक सत्यधर्म हा मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा - प्राचार्य जी. पी. माळीजिल्हातंर्गत काँग्रेसमध्ये होणार फेरबदल, पदाधिकारी नेमणुकीसंदर्भात आढावा बैठकडॉ. बापूजी साळुंखे  इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये उलगडली भारतीय वायुदलातील करिअरची संधी  घोडावत ऑलिम्पियाड स्कूलचे डॉ.होमी भाभा परीक्षेत यशसक्तीच्या टीईटी परीक्षेतून सवलत मिळण्यासाठी खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार - खासदार धैर्यशील माने

जाहिरात

 

कोल्हापूरच्या विकासासाठी महापालिका- कोल्हापूर फर्स्ट एकत्र काम करणार

schedule12 Apr 26 person by visibility 21 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूरचा विकास हे सूत्र ठरवून कोल्हापुरातील विविध संस्था एकवटलेल्या ‘कोल्हापूर फर्स्ट’या संस्थेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांची भेट घेतली. या भेटीत कोल्हापूर शहरातील विविध विकास प्रकल्पासंबंधी चर्चा झाली. कोल्हापूर फर्स्टचे चेअरमन सुरेन्द्र जैन यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक वारशांचे दर्शन घडवणारी फोटो फ्रेम देऊन आयुक्त भारुड यांना भेट दिले. आयुक्त भारूड यांनी यावेळी कोल्हापूर फर्स्टच्या कार्याचे कौतुक करत सहकार्याची भूमिका अधोरेखित केली. तसेच, कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी कोल्हापूर महानगरपालिका व कोल्हापूर फर्स्ट यांनी समन्वयाने एकत्रित काम करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली. या प्रसंगी उपाध्यक्ष डॉ कोडोलीकर, सचिव बाबासो कोंडेकर, सहसचिव जयदीप पाटील, हॉटेल मालक संघाचे सचिन शानबाग, सी. ए. असोसिएशन चेअरमन आशिष सेवेकरी, विशेष निमंत्रित मिलिंद आळवेकर, सतीश डकरे आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes