बबेराव जाधवांच्या पायवाटेवरूनच पुढे जाण्याचा आमचा संकल्प – माजी आमदार जयश्री जाधव
schedule03 Jul 25 person by visibility 41 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, ककोल्हापूर : “समाजासाठी जीवन झोकून देणारे, शिवभक्ती व अध्यात्मातून कैलासगडची स्वारी मंदिराचे अध्यक्ष बबेराव शंकरराव जाधव यांनी एक नवा आदर्श उभा केला आहे. ते आज आपल्यात नसले तरी त्यांच्या कार्याचा प्रकाश आमच्या मार्गदर्शनासाठी सदैव जिवंत आहे. त्यांची शिकवण, त्यांच्या आठवणी आणि कार्याच्या पायवाटेवरूनच आम्ही चालत राहणार आहोत” अशा शब्दांत माजी आमदार व शिवसेना उपनेत्या जयश्री जाधव यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
कैलासगडची स्वारी मंदिरात आयोजित शोकसभेत त्या बोलत होत्या. मंदिरचे उपाध्यक्ष व युवा उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव प्रमुख उपस्थित होते. दादा म्हणून परिचित असलेल्या बबेराव जाधव आणि दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांनी आपल्या सर्वांच्या साथीने कैलासगडची स्वारी मंदिराला केवळ एक धार्मिक स्थळ न ठेवता, ते श्रद्धा, सेवा, आणि समाजसेवेचं केंद्र बनवले. त्यांच्या स्मृतीस वंदन करत, या मंदिराची सेवा, त्याच्या प्रत्येक उपक्रमाची उभारणी आणि प्रत्येक भक्ताचा सन्मान हे सर्व मी माझ्या शंभर टक्के समर्पणाने आणि सर्वांच्या साथीने यशस्वी करण्याचा पूर्ण प्रयत्न करीन, असा विश्वास मंदिरचे उपाध्यक्ष सत्यजित जाधव यांनी व्यक्त केला. यावेळी माजी नगरसेवक संभाजी देवणे, अरुण आवटे, विवेक कोरडे, तानाजीराव घाटगे, प्रशांत आयरेकर, उदय कारजगार, विलास गौड यांची श्रद्धांजलीपर भाषणे झाली. यावेळी शिवाजी जाधव, विठ्ठलराव जाधव, केशवराव पोवार, तानाजी जाधव, अशोक कांबळे, गणेश भोसले, प्रदीप मराठे, कमलाकर भोसले, प्रदीप गौड, राजू जाधव, शाहीर अजित आयरेकर, राजेंद्र काटे, रोहित कारंडे, अजय भोसले, कुलदीप भोसले, अनिल गौड, प्रसाद भोसले, राजू गौड, हेमंत घाटगे, महेश घाटगे, आशिष पवार आदी उपस्थित होते.