देवकर पाणंद ते कळंबापर्यंतचा मार्ग बनणार आयडियल रोड ! आमदारांच्या अधिकाऱ्यांना सूचना
schedule06 Jan 25 person by visibility 31 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : देवकर पाणंद ते कळंबा साई मंदिरपर्यंतचा मार्ग आयडियल रोड बनविण्यात येणार आहे. यासंबंधींचा आराखडा तयार करण्याच्या सूचना आमदार अमल महाडिक यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या. केवळ डांबरीकरण न करता रस्त्याच्या दुतर्फा रुंद फुटपाथ, सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटर्स, नागरिकांना बसण्यासाठी बेंच आणि वृक्षारोपण या पद्धतीने हा रस्ता तयार करण्यासंबंधीच्या सूचना त्यांनी दिल्या.
देवकर पाणंद चौकातून तपोवन मैदान मार्गे कळंब्याकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. खड्डेमय रस्त्यावरून जाताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. याशिवाय धुळीमुळे परिसरातील नागरिक वैतागले आहेत. या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी जोर धरत होती. या मागणीची दखल घेत आमदार महाडिक यांनी माजी नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील, महापालिकेचे कनिष्ठ अभियंता अक्षय आटकर यांच्यासह या रस्त्याची पाहणी केली.