हरवलेले मोबाईल पोलिसांनी शोधले, मोबाइलधारकांनी मानले आभार !
schedule20 Jun 24 person by visibility 282 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : लक्ष्मीपुरी पोलिसांनी सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर या प्रणालीचा उपयोग करून हरवलेले नऊ मोबाईल शोधले.ते मोबाईल तक्रार केलेल्या मोबाइलधारकांना परत दिले. नऊ मोबाईलची किंमत ९० हजार पर्यंत भरते. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिले होते. पोलीस उपाधीक्षक अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी तपास सुरू केला. सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर या प्रणालीचा वापर करत हरवलेले नऊ मोबाईल शोधून काढले हे मोबाईल पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी मोबाईलधारकांना परत केले. पोलीस कॉन्स्टेबल इर्शाद महात, मंगेश माने, किशोर पवार, प्रतीक शिंदे यांनी हा तपास केला.