Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
 अभियंता तरुण पिढीने उद्योजकीय मानसिकता बाळगावी - दीपक जोशी२१ लिटर दुधाची म्हैस, ३५ लिटर दुधाची गाय ठरली गोकुळश्रीकोल्हापुरात गव्हर्मेंट लॉ कॉलेज सुरू करा-: अमल महाडिकांची मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणीएनएमएमएस परीक्षा 28 डिसेंबरलासीपीआरमधील वैद्यकीय बिलांच्या चौकशीसाठी समिती, पालकमंत्र्यांचे आदेशाने समिती स्थापन रहिवासाचा कोणताही पुरावा ग्राह्य धरा : माजी नगरसेवकांची आयुक्तांच्याकडे मागणी महापालिकेची अंतिम मतदार यादी पुन्हा लांबणीवर, 15 डिसेंबरला यादी जाहीर होणार खाबुगिरीची सेवा, सीपीआरमधील मॅडम, सरांच्या नावावर लाखोची आकडेमोड! वैद्यकीय बिल मंजुरीत डल्ला !!ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांचे धरणे आंदोलन, संचमान्यतेतील त्रुटी दूर कराशिक्षणाधिकारी गणपती कमळकर यांची कोल्हापुरात बदली

जाहिरात

 

शक्तीपीठ महामार्गवरुन शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पसरविण्याचा विरोधकांचा प्रयत्न : आमदार राजेश क्षीरसागर

schedule11 Jul 25 person by visibility 233 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग संदर्भात विरोधकांकडून केवळ राजकारणासाठी विरोध केला जात असून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पसरवून त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे, वास्तवात अनेक शेतकऱ्यांचे शक्तीपीठ महामार्गाला समर्थन असून आज बैठकीसाठी आलेल्या अनेक शेतकऱ्यांनी भूसंपादनाला मान्यता देऊन सातबारे देखील जमा केले, अशी माहिती महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आमदार क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कार्यालयात शक्तिपीठ महामार्गा बाबत शेतकरी आणि अधिकारी यांची  बैठक  झालीआमदार  क्षीरसागर यांनी, " बैठकीमध्ये  विरोधकांकडून चुकीच्या पद्धतीने सांगण्यात आलेल्या रस्त्याची रुंदी ३०० मीटर नसून केवळ शंभर ते ११० मीटर एवढीच असणार आहे, त्याचबरोबर  रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेतकऱ्यांची वाहन आणि बैलगाड्या यांना येण्या जाण्यासाठी रस्ता असणार आहे. तसेच शेतकऱ्यांना बाजारभावाप्रमाणे योग्य किंमत दिली जाणार आहे. यापूर्वीच्या पुराचा अनुभव घेऊन सध्या वाढवण्यात येणाऱ्या अलमट्टी धरणाची उंची वाढणार आहे असे समजून संपूर्ण रस्त्यावर जिथे पूरबाधित क्षेत्र होते, तिथे भराव टाकता, पिलर वर पूल बांधण्यात येतील.

 बैठकीसाठी 60 गावातील  प्रमुख लोकांनी उपस्थिती लावून शक्तीपीठ महामार्गाला लोकांचा विरोध नसून राजकारणाला दबून नागरिक पुढे येत नाही आहेत, तुम्ही मोजदाद सुरू करा, नागरिकांनी शेतकरी स्वतःहून तुम्हाला समर्थन देतील, असे सांगून अनेकांनी सातबारा उतारा या बैठकीत दिला बैठकीला एम एस आर डी सी चे एम.डी बी गायकवाड, शिवसेनेचे महानगर समन्वयक कमलाकर जगदाळे, कोल्हापूर जिल्हा शक्तीपीठ महामार्ग समर्थक समितीचे अध्यक्ष दौलतराव जाधव, बापू शिंगाडे, रुचीला बाणदार, नवनाथ पाटील, योगेश पाटील, रामचंद्र अकोलकर, बाबुराव खापरे,सूर्यकांत चव्हाण, विजय हवालदार, यांच्यासह  शेतकरी उपस्थित होते...

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes