Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
ब्राह्मण महासंघाच्यावतीने रविवारी ब्राह्मण शेतकरी मेळावासमरजितसिंह घाटगेंची भाजपमध्ये पुन्हा वापसी !- आता कुठलेही प्रयोग करायचे नाहीत, जे पक्ष सांगेल ते काम करणार! ! कोल्हापूरसाठी बेस्ट सेवासुविधा देण्याला प्राधान्य - आयुक्त राजेंद्र भारुडसामान्य कुटुंबातील पोरीने एमपीएससीतून एकावेळी दोन पोस्ट मिळवल्या ! सेंट्रिग काम करणारा बाप, शेतमजूर आईचे फेडले पांग !!ङङक्षथछ ततग्रामीण जीवन समृद्ध करण्यात आनंदराव पाटील -चुयेकरांचा मोठा वाटा : चेअरमन नविद मुश्रीफ    सीईओंकडून विभागांची अचानक पाहणी! अधिकाऱ्यांना सूचना, कर्मचाऱ्यांची उडाली धांदल !!ग्रामीण भागातील डॉक्टरांचा केडीजीपीएतर्फे सन्मान, रविवारी पुरस्कार वितरण समारंभप्राथमिक शिक्षक बँकेला तीन कोटी सहा लाख निव्वळ नफा : अध्यक्षा वर्षा शरद केनवडेराज्यातील मान्यप्राप्त खाजगी प्राथमिक शाळांचे वेतनेतर अनुदान घ्या : राजेंद्र कोरे

जाहिरात

 

ब्राह्मण महासंघाच्यावतीने रविवारी ब्राह्मण शेतकरी मेळावा

schedule08 Apr 26 person by visibility 49 categoryउद्योग

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी :  अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्यावतीने कोल्हापुरात ब्राह्मण शेतकरी मेळाव्याचे आयोजन रविवारी  १२ एप्रिल 2026 रोजी करण्यात आले आहे. हा मेळावा मांगल्य हॉल, ताराबाई पार्क येथे होणार आहे. अशी माहिती शेतकरी आघाडीचे अध्यक्ष हरीश शिंदे, महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्यामराव जोशी, जिल्ह्याचे अध्यक्ष विवेक जोशी  यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने कोल्हापुरात अशा प्रकारच्या मेळाव्याचे तिसऱ्यांदा आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्रातून तब्बल ५०० हून अधिक शेतकरी या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत, या मेळाव्यास अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंदराव कुलकर्णी,  आमदार अमल महाडिक, परशूराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि कॅबिनेट राज्यमंत्री दर्जा आशिष दामले, चितळे उद्योंग समहाचे संचालक गिरीश चितळे, नेचर केअर फर्टीलायझर्सचे कार्यकारी संचालक जयदेव बर्वे, प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर,शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. मेळाव्याचे उद्धाटन सकाळी दहा वाजता  होणार आहे. शेतकऱ्यांना शेतीविषयक आधुनिक ज्ञान आणि अत्याधुनिक तंत्रजञानाची माहिती व्हावी हा या मेळावा मागील उद्देश असल्याचे देखील त्यांनी सांगितले. या मेळाव्यात शेतकऱ्यांना माहितीपर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये हवामान तज्ञ पंजाबराव डख हे बदलते हवामान या विषयावर, नाबार्ड मधील विविध योजनांची माहिती आर.एस.चौगले देणार आहेत. तर पॉली फॉस्फेट तंत्रज्ञानावर जयदेव बर्वें आणि कुटंब व अर्थव्यवस्था या विषयावर अरविंद कुलकर्णी मार्गदर्शन करणार आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाने २०१६ हे वर्ष आंतरराष्ट्ीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केले आहे. या निमित्ताने दहा महिला शेतकऱ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. यामध्ये भुदरगड तालुक्यात दारवाड येथील छाया श्रीकृष्ण कुलकर्णी, तासगाव तालुक्यातील मांजर्डे येथील मंजुषा माधव कुलकर्णी, सातारा जिल्ह्यातील भादे येथील सुनीती सुरेंद्र धायगुडे, पन्हाळा तालुक्यातील दिघवडे येथील स्मिता सचिन कुलकर्णी, कोल्हापुरातील विद्या भरत ठकार,  शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर येथील ऋतुजा हृदयनाथ देशपांडे, हेमांगी हरिहर देशपांडे,  निपाणी तालुक्यातील बेडकीहाळ येथील श्रीया मुकुंद इनामदार, वाळवा तालुक्यातील शिरपूर येथील वरदा श्रीकृष्ण हसबनीस तर माढा तालुक्यातील उंदरगाव येथील विद्या श्रीपाद कुलकर्णी या महिला शेतकऱ्यांचा सन्मान होणार आहे. मेळाव्यात सहकार भूषण पुरस्काराने कराड येथील सुभाष जोशी यांना प्नदान करण्यात येणार आहे.भिलवडी येथील गिरीश चितळे व विटा येथील जयंत बर्वे यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित येणार करण्यात आहे. पत्रकार परिषदेस,गुरुप्रसाद कुलकर्णी, आशिष आमटे, प्रमोदिनी हर्डीकर, सचिन कुलकर्णी, जिवन कुलकर्णी,सचिन पितांबरे, उदय गोसावी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes