Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गांधीनगरमधील अनधिकृत बांधकामावरील कारवाईला स्थगिती देण्यास सर्किट बेंचचा नकारअजीम नवाज राही यांना रत्नाकर काव्य पुरस्कारकुलगुरू नियुक्तीला दिरंगाई, सिनेट सदस्यांचे राज्यपालाना पत्र ! लाठया खाऊ, जेलमध्ये जाऊ पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही ! नऊ जूनला कोल्हापुरात महामोर्चा !!डीवाय पाटील ज्युनिअर कॉलेजची महिमा शिर्के बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीयई-चलन संदर्भातील मागण्यांवर सरकार सकारात्मक, वाहतूकदारांना न्याय देण्यासाठी कार्यवाही - प्रताप सरनाईकउल्का महाजन, चिन्मयी सुमीत, प्रतिभा खैरनार, नितीन कोत्तापल्ले यांना दमसा सभेचे पुरस्कारहद्दवाढीवरुन महापालिका सभा तहकूब, गांधीनगरातील अतिक्रमण हटविण्यासाठी सभागृह आक्रमक चारचाकी वाहन सारले बाजूला…नगरसेवक सवार झाले इलेक्ट्रिक बाईक, सायकलवर !कृष्णराज महाडिक यांचा बार्शी - सोलापूर एसटी प्रवास

जाहिरात

 

पटपडताळणीस शैक्षणिक व्यासपीठ - मुख्याध्यापक संघाचा तीव्र विरोध

schedule08 Apr 26 person by visibility 278 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ कोल्हापूर व जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, कोल्हापूर यांच्या वतीने कोल्हापूर विभागाच्या शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर व माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांना राज्यातील शाळांची पटपडताळणी पुढे ढकलण्याबाबत लेखी निवेदन देण्यात आले.

शिक्षक आमदार जयंत आसगावकर, शैक्षणिक व्यासपीठ अध्यक्ष एस. डी. लाड, शिक्षक नेते दादासाहेब लाड,मुख्याध्यापक संघ चेअरमन राहूल पवार,सचिव आर. वाय. पाटील, उपाध्यक्ष रवींद्र मोरे, सुधाकर निर्मळे,श्रीकांत पाटील, एम. जी. पाटील, संदीप पाथरे, एस. के. पाटील यांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. यामध्ये राज्यातील शाळांची पटपडताळणी  ११, १५ व २२ एप्रिल रोजी पॅट परीक्षेच्या दरम्यान आयोजित केलेली आहे. तसेच त्या दिवशी इयत्ता ९ वी व इयत्ता ११ वी च्या विशिष्ट विषयांच्या परीक्षा घेण्याबाबतही सूचना आहेत. परंतु अनेक शाळांनी यापूर्वीच आपल्या स्तरावर इयत्ता ९ वी व इयत्ता ११ वी च्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करून विद्यार्थ्यांना दिले आहे.

 काही शाळांमध्ये या वर्गाच्या परीक्षा १ ते १० एप्रिल दरम्यान पूर्ण करून, त्यानंतर इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी जादा तास सुरू करण्याचे नियोजन केलेले आहे.  अशा परिस्थितीत सध्याच्या नियोजनात तातडीने बदल करणे शाळांसाठी अत्यंत कठीण आहे.तसेच शैक्षणिक वर्षाच्या शेवटी पटपडताळणी करणेही व्यवहार्य व सोयीचे नाही. पटपडताळणी पुढील शैक्षणिक वर्षात सप्टेंबर महिन्यात आयोजित करावी, असे निवेदनात म्हटले आहे. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes