Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गांधीनगरपर्यंतच्या हद्दीतील जागेवरील बांधकामांची महापालिका करणार तपासणी , शुक्रवारपासून सुरुवातज्यांच्याकडे मतांची शक्ती नाही, गोकुळच्या घडामोडीवरुन भैया मानेंनी डिवचलेशिक्षण समिती सभापतींच्या बैठकीत शाळांचा दर्जा सुधारणेबाबत चर्चामित्र - बायसॅग-एन करारामुळे महाराष्ट्राच्या तंत्रज्ञानाधिष्ठित विकासाला चालना : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसआप युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी मोईन मोकाशीएचव्हीएसीआर क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी अपार संधी— योगेश गांधीबार असोसिएशनच्या निवडणुकीत तीस वकील रिंगणात, चिटणीस - मंडलिक पॅनेलमध्ये थेट लढतकोल्हापुरात एकाचवेळी ५०० भात प्रकारांची निर्मिती, रविवारी होणार विश्वविक्रमरामसिना ग्रुपकडून द सिटी सेंटर प्रीमियम व्यावसायिक प्रकल्पाचे भूमिपूजन जनहित याचिकेचा प्रभाव : बाल हक्क संरक्षण आयोग अधिक सक्षम, पदसंख्येत मोठी वाढ

जाहिरात

 

गांधीनगरपर्यंतच्या हद्दीतील जागेवरील बांधकामांची महापालिका करणार तपासणी , शुक्रवारपासून सुरुवात

schedule23 Apr 26 person by visibility 48 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या गांधीनगरपर्यंतच्या हद्दीतील जागा महानगरपालिकेचीच असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने तत्काळ हालचाली सुरू केल्या आहेत. आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या जागेवरील सर्व बांधकामांची पुनर्तपासणी करण्याचे आदेश दिले. याबाबत निवडणूक कार्यालयात बैठक पार पडली. 

 बैठकीस अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उप-शहर रचनाकार एन. एस. पाटील तसेच अभियंता व सर्व्हेअर उपस्थित होते. बैठकीत शुक्रवार २४ एप्रिल २०२६ पासून गांधीनगर पर्यंतच्या महापालिकेच्या हद्दीतील उचगांव महसूली गावांतील सर्व्हेनंबरातील सर्व बांधकामांची सखोल तपासणी करण्याचे निश्चित करण्यात आले.  तपासणी सकाळी साडे दहा  वाजल्यापासून सुरू करण्यात येणार असून यासाठी पाच पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांमध्ये नगररचना विभाग, विभागीय कार्यालय क्रमांक चार, घरफाळा विभाग तसेच परवाना विभागातील कर्मचारी सहभागी राहणार आहेत. या मोहिमेत संबंधित जागेवरील सर्व इमारतींची मोजमापे करून बांधकामांची पडताळणी केली जाणार आहे. तसेच घरफाळा व परवाना विभागामार्फत आवश्यक नोंदींची छाननीही करण्यात येणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes