एचव्हीएसीआर क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी अपार संधी— योगेश गांधी
schedule23 Apr 26 person by visibility 149 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर ‘एचव्हीएसीआर क्षेत्रातील करिअर संधींचा वेध घेत “हे क्षेत्र विद्यार्थ्यांसाठी मोठ्या संधी निर्माण करणारे असून विविध अभियांत्रिकी शाखांतील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा,” असे योगेश गांधी यांनी सांगितले.
तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिग अँड टेक्नॉलॉजी वारणानगर येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागात इशरे विद्यार्थी शाखेचा पुर्नस्थापना सोहळा उत्साहात झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर इशरे चॅप्टरचे अध्क्ष डॉ. अवेसअहमद हुसेनी, प्रेसिडेंट इलेक्ट योगेश गांधी, खजिनदार विजय पाटील उपस्थित होते. तज्ज्ञ व्याख्यानासाठी डॉ. वंदना पुसाळकर यांची विशेष उपस्थिती लाभली. एचव्हीएसीआर म्हणजे हीटिंग, वेंटिलेशन आणि एअर कंडिशनिंग, ही एक तंत्रज्ञान प्रणाली आहे जी बंद जागेत, जसे की घर, कार्यालय किंवा वाहनांमध्ये तापमान, आर्द्रता आणि हवेची गुणवत्ता नियंत्रित करते। हे प्रणाली उष्णता, थंडी आणि हवा खेळती ठेवण्याचे काम करते. असेही नमूद केले.
फॅकल्टी अॅडव्हायझर प्रा. आतिश चव्हाण यांनी स्वागत केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एन. माने, अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे, यांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. पी. व्ही. मुळीक, प्रा. जी. एस. कांबळे यांची उपस्थिती लाभली. डॉ. हुसेनी यांनी पदाधिकाऱ्यांना शपथ देऊन विद्यार्थी शाखेच्या पुनर्स्थापनेची अधिकृत घोषणा केली. सलोनी पाटील यांनी आभार मानले.