Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गांधीनगरपर्यंतच्या हद्दीतील जागेवरील बांधकामांची महापालिका करणार तपासणी , शुक्रवारपासून सुरुवातज्यांच्याकडे मतांची शक्ती नाही, गोकुळच्या घडामोडीवरुन भैया मानेंनी डिवचलेशिक्षण समिती सभापतींच्या बैठकीत शाळांचा दर्जा सुधारणेबाबत चर्चामित्र - बायसॅग-एन करारामुळे महाराष्ट्राच्या तंत्रज्ञानाधिष्ठित विकासाला चालना : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसआप युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी मोईन मोकाशीएचव्हीएसीआर क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी अपार संधी— योगेश गांधीबार असोसिएशनच्या निवडणुकीत तीस वकील रिंगणात, चिटणीस - मंडलिक पॅनेलमध्ये थेट लढतकोल्हापुरात एकाचवेळी ५०० भात प्रकारांची निर्मिती, रविवारी होणार विश्वविक्रमरामसिना ग्रुपकडून द सिटी सेंटर प्रीमियम व्यावसायिक प्रकल्पाचे भूमिपूजन जनहित याचिकेचा प्रभाव : बाल हक्क संरक्षण आयोग अधिक सक्षम, पदसंख्येत मोठी वाढ

जाहिरात

 

मित्र - बायसॅग-एन करारामुळे महाराष्ट्राच्या तंत्रज्ञानाधिष्ठित विकासाला चालना : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

schedule23 Apr 26 person by visibility 13 categoryमहानगरपालिका

 

महाराष्ट्र न्यूज वन, प्रतिनिधी : राज्यातील पायाभूत सुविधा विकास, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि पर्यावरण व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी ‘मित्र’ आणि बायसॅग-एन यांच्यात झालेला सामंजस्य करार महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्राच्या सर्वांगीण आणि तंत्रज्ञानाधिष्ठित विकासाला चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

वर्षा निवासस्थान येथे मित्र आणि बायसॅग-एन यांच्यात  सामंजस्य  करा  करण्यात आला. याप्रसंगी माजी सहकार मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील,  मित्र संस्थेचे उपाध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, मित्र - महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन) चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी,  बायसॅग-एन महासंचालक डॉ. टी. पी. सिंह,  मित्रचे वरिष्ठ सल्लागार डॉ. विराज लोलियाना, संशोधन अधिकारी सुमीरन बलसेकर,  दिपंकर होवाळ, संकेत निंबाळकर, प्राजक्ता माळी उपस्थित होते.

या सामंजस्य कराराअंतर्गत उपग्रहाद्वारे संकलित केली जाणारी माहिती या माहितीचे विश्लेषण याचा आधार घेवून भू- स्थानिक वैशिष्ठ्यांच्या आधारे प्रकल्पाची आखणी, संचलन आणि अंमलबजावणी केली जाणार आहे.भू-स्थानिक क्षेत्रात धोरणे व मानक कार्यपद्धती विकसित करण्यासाठी  तांत्रिक सहाय्य करणे. या माध्यमातून प्राप्त झालेली माहिती प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून भू-स्थानिक तंत्रज्ञान, दूरसंवेदी तंत्रज्ञान, उपग्रह संप्रेषण, जिओ-इन्फॉर्मेटिक्स आणि डेटा अ‍ॅनालिटिक्स प्लॅटफॉर्म्स या सारख्या सोफ्टवेअर प्रणालींचा वापर करून अधिक परिणामकारकरित्या शासकीय योजना व प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी सुनिश्चित केला जाणार आहे. बिग डेटा मॅपिंग, प्रगत फोटोग्रामेट्री, डिफरेंशियल जीपीएस आणि विषयनिहाय भू-स्थानिक मॉडेलिंगचा वापर करून अचूक नकाशांकन व स्थानिक विश्लेषण करणे. प्रकल्पांच्या गरजेनुसार सॉफ्टवेअर प्रणालींचा विकास व सानुकूलन करण्यात येईल. यामध्ये उंची नमुना, पृष्ठभाग नमुना, अचूक ऑर्थो-फोटो निर्मिती आणि प्रगत कार्टोग्राफीचा समावेश, बहुवर्णीय उपग्रह प्रतिमांच्या प्रक्रियेद्वारे प्राप्त माहितीचा उपयोग करून प्रकल्पांचे नियोजन, रचना आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी व्यापक डेटा उपलब्ध करून देण्याचे ठरले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes