शिक्षण समिती सभापतींच्या बैठकीत शाळांचा दर्जा सुधारणेबाबत चर्चा
schedule23 Apr 26 person by visibility 11 categoryशैक्षणिकजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिक्षण व क्रीडा समितीची सभापती शितल प्रविण यादव, यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभापती यादव यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील पटसंख्येमध्ये वाढ करणे, विदयार्थ्यांची गुणवत्ता सुधारणा करणे, शाळांचा दर्जा सुधारण्याबाबत सर्वांना मार्गदर्शन केले तसेच दुर्गम भागातील शिक्षकांच्या उपस्थितीबाबत चर्चा झाली. सभेला शिक्षण समितीचे नुतन सदस्य, जिल्हयातील सर्व गटशिक्षणाधिकारी व मुख्यालयातील शिक्षण विभागाचे अधिकारी, उपस्थित होते. शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉ.मिना शेंडकर यांनी शिक्षण विभागाकडील योजना व विभागाने राबविलेल्या उपक्रमांबाबतची माहिती सादर केली. गटशिक्षणाधिकारी यांनी आप-आपल्या तालुक्यातील शैक्षणीक गुणवत्ता व पटवाढी संदर्भात मार्गदर्शन करुन सर्व संघटना प्रतिनिधी समवेत बैठक घेवून विदयार्थी व शिक्षक यांच्या गणवेशाबाबत चर्चा करणेत आली. जिल्हा परिषद सदस्य एकनाथ पाटील, भगवान पाटील, उत्तरा शिंदे, स्नेहल वेल्हाळ, सौ. रेखा मुगडे, शुभांगी कुंभार उपस्थित होते.