+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust२५ हजाराची लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यास अटक adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार
Screenshot_20240226_195247~2
schedule06 Dec 22 person by visibility 639 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी : " सीमाप्रश्नावर आता भूमिका घेण्याची वेळ आली आहे.सीमा वादाला वेगळं वळण दिले जात आहे. येत्या 24 तासात हल्ले थांबवा, नाही तर आमचाही संयम सुटेल. " असा सज्जड दम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी दिला आहे.
 बेळगाव येथे कन्नड रक्षण वेदिकेकडून महाराष्ट्राच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याचा पवार यांनी निषेध केला. " सध्या सीमाभागात जे काही सुरू आहे ते निषेधार्ह आहे. सीमाप्रश्नावर आता भूमिका घेण्याची वेळ आली आहे. सीमा वादाला वेगळे वळण दिले जात आहे. येत्या 48 तासांमध्ये हे सगळं संपलं नाही तर मला बेळगावला जावे लागेल. बेळगाव शमधील लोकांना दिलासा देण्यासाठी माझ्यासहित सगळ्यांना तिथे जावे लागेल" असे पवार यांनी ठणकावले.
"केंद्राने बघायची भूमिका घेऊ नये.दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा. मात्र कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याकडून चिथावणीखोर भाषा केली जात आहे. सीमाभागात हल्ले थांबले नाहीत तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. संयमला मर्यादा असते. सीमा भागातील परिस्थिती गंभीर आहे. जर काही घडलं तर त्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री जबाबदार असतील. माणसा-माणसांमध्ये, भाषिका-भाषिकात कटुता वाढणे हे देशाच्या ऐक्यासाठी घातक आहे."असेही पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.