Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे 40 स्टार प्रचारक ! माजी मंत्री आमदार खासदारांचा समावेशहलगर्जीपणा चालणार नाही, वेळेत काम पूर्ण करा- डेडलाईन पाळा- अमल महाडिकांच्या अधिकाऱ्यांना सूचनाभाजपा - नेते कार्यकर्त्यांचा ढोल ताशावर ठेकालंडनमध्ये रंगला माजी विद्यार्थ्यांचा मेळावा, डॉ. संजय पाटील, तेजस पाटलांनी साधला संवादगोकुळमध्ये सहकार सप्‍ताहनिमित्‍त चेअरमनांच्या हस्ते ध्‍वजारोहणप्रा. महेश साळुंखे यांना शिवाजी विद्यापीठाची पीएचडीजज ददकोल्हापुरात आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग रिंगसाठी ! धनंजय महाडिकांची सहकार्याची ग्वाही !! महापालिकेसाठी आरक्षण निश्चित, निवडणुकीसाठी अनेकांचे गुडघ्याला बाशिंग ! इच्छुक लागले तयारीला !!कोल्हापूर शहरात बिबट्याचा धुमाकूळ ! पोलिसावर झडप, चौघे जखमी!!

जाहिरात

 

शाहू स्मारक भवनमध्ये उलगडलाय लेफ्टनंट जनरलांचा झुंझार इतिहास

schedule11 Oct 25 person by visibility 195 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : लेफ्टनंट जनरल एस. पी. पी. थोरात तथा शंकरराव पांडूरंग पाटील, एक झुंझार सेनानीभारताच्या स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात लष्करी सेवा बर्मा मोहिमेत सहभागदुसऱ्या महायुद्धायच्या काळात कंगावच्या लढाईत आघाडीवर नेतृत्वस्वातंत्र्यानंतर भारतीय लष्करात विविध प्रशासकीय पदावर कामदुसऱ्या महायुद्धातील कामगिरीनंतर कोल्हापूर संस्थाने त्यांना बहाल केलेली ‘झुंझारराव’ही उपाधी...कोल्हापूरसाठी अभिमानस्पद म्हणजे हा सेनानी करवीरनगरचा पुत्रबारा ऑगस्ट १९०६ ते दहा ऑगस्ट १९९२ असा जीवनप्रवास...त्यांचा झुंझार इतिहास येथील शाहू स्मारक भवनमध्ये उलगडला आहे. त्यांच्या संग्रहातील दुर्मिळ वस्तू, शौर्यपदके, स्मृतिचिन्हे आणि छायाचित्रांचे प्रदर्शन भरविले आहे. १२ ऑक्टोबर २०२५ अखेर ते रात्री आठ वाजेपर्यंत पाहण्यासाठी खुले आहे.

निमित्त आहे, लेफ्टनंट जनरल एस. पी. पी. थोरात यांच्या 'माझी शिपायगिरी' चे सुधारित आवृत्तीच्या प्रकाशनाचे.  रविवारी, १२ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५.३० वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन, प्रकाशन समारंभ होत आहे. थोरात यांनी भारतीय सैन्यातून लष्करप्रमुख पदावरून निवृत्त झाल्यानंतर १९८८  मध्ये हे आत्मचरित्र लिहिले. या सुधारित आवृत्तीत वाचकांसाठी काही अधिक मनोरंजक माहिती तसेच दुर्मिळ छायाचित्रे उपलब्ध आहेत. लेफ्टनंट जनरल एस.पी.पी.थोरात यांचे पुत्र व नाबार्डचे माजी अध्यक्ष, यशवंत थोरात व रिझर्व्ह बँकेच्या माजी गव्हर्नर उषा थोरात यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम होत आहे.

प्रदर्शनास शनिवारी (११ ऑक्टोबर) सुरुवात झाली. या प्रदर्शनात लेफ्टनंट जनरल एस.पी.पी.थोरात यांची छायाचित्रे आहेत. युद्धात आघाडीवर लढलेल्या शौर्याचे साक्ष देणारे क्षण अंगावर रोमांच उभे करतात. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यासोबतचे फोटो वेगळे आकर्षण आहे. एकदा, थोरात यांच्यासह अन्य पाच अधिकारी विमान अपघातातून बचावले होते. तेव्हा हवाईदलप्रमुखांनी, त्या विमानातील खुर्ची, त्या पाचही अधिकाऱ्यांना भेट दिली होती. प्रदर्शनात ती खुर्ची व त्या विमानाची लहानशी प्रतिकृती आहे.

दुसऱ्या महायुद्धात वापरलेला ट्रान्समीटर आणि रिसिव्हर आहे. दहा किलो वजनाचा हा रिसीव्हर आजही कार्यरत आहे.दुसऱ्या महायुद्धापूर्वी भारताकडे असलेल्या जुन्या शस्त्रसामग्री व वाहनांचे प्रतिबिंब दाखविणारे खेळण्यांच्या आकारातील मॉडेल्स आहेत. नागांनी जनरल थोरात यांना दिलेली नागा तलवारीची जोडी शौर्याचा इतिहास कथन करते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes