Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
क्रीडाई कोल्हापूरतर्फे योग दिन साजराउद्धव ठाकरे अन् कार्यकर्त्यांमधील नाते घट्ट, फुटीर खासदारांना मतदार धडा शिकवतीलमहापालिकेचा वॉच अनधिकृत पाणी कनेक्शनवर, मीटर रीडरांच्या बदल्या होणारराज्य गुणवंत कामगार असोसिएशनतर्फे २८ जूनला पुरस्कार वितरणवारणा विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिन साजराकोल्हापूरसाठी हवे विशेष पॅकेज, राजेश क्षीरसागरांची अमित शहांच्याकडे मागणीजिल्ह्यात एक लाखाहून अधिक एकल महिला, त्यांच्या सक्षमीकरणाला जिपकडून प्राधान्य – सीईओ डॉ. जॅसमिनश्री आंनदराव आबिटकर कॉलेज ऑफ इंजिनीअरींगच्या डिप्लोमा विभागाचा निकाल 93 टक्केगांधीनगर परिसरातील अनधिकृत बांधकामावर जेसीबी, बांधकामे पाडण्यास सुरुवात कोल्हापूर फर्स्टतर्फे गृहमंत्र्यांना निवेदन, ईएसआय मेडिकल कॉलेजची मागणी

जाहिरात

 

उद्धव ठाकरे अन् कार्यकर्त्यांमधील नाते घट्ट, फुटीर खासदारांना मतदार धडा शिकवतील

schedule23 Jun 26 person by visibility 23 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : ‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि कार्यकर्ते यांच्यातील नाते घट्ट आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशिवाय दुसरे कोणी पक्षप्रमुख असूच शकत नाहीत. फुटीर खासदारांना मतदार धडा शिकवतील.’ असे शिवसेनेचे सचिव व माजी खासदार विनायक राऊत यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

 माजी खासदार राऊत हे कोल्हापूर दौऱ्यावर होते. कोल्हापूर शहर शिवसेनेतर्फे मराठी अस्मिता पुरस्कार वितरण समारंभ झाला. तसेच त्यांच्या हस्ते शिवसेना युवासेना -आदित्य युवा हेल्पलाइनचे उद्घाटन झाले. शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, शहरप्रमुख मंजीत माने, निरीक्षक उदय दळवी, संजय चौगले, विराज पाटील, नगरसेवक सुनील मोदी, चैतन्य देशपांडे, सुमित मेळवंकी, अक्षय मोरे, अक्षय घाटगे, संकेत गुरव, पप्पू कोंडेकर, अनिकेत गुरव आदींच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला.

याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना माजी खासदार राऊत यांनी फुटीर खासदारावर टीकास्त्र सोडले. ‘काही जण स्वतला बाजारात विक्रीला काढले आहे. त्यांच्यासमोर मोठी रक्कम ठेवली की ते सगळे काही विसरतात. अशांना मतदार निश्चित धडा शिकवतील. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटनात्मकदृष्टया पूर्णपणे सक्रिय आहे. पक्षप्रमुख ठाकरे हे मुंबईनंतर परभणी, धाराशिव, शिर्डी येथे दौरे काढणार आहेत.’असे राऊत यांनी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes