क्रीडाई कोल्हापूरतर्फे योग दिन साजरा
schedule23 Jun 26 person by visibility 11 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्ह्यातील बांधकाम व्यावसायिकांची शिखर संस्था असलेल्या क्रीडाई कोल्हापूरतर्फे जागतिक योगदिन साजरा करण्यात आला. सिग्मा हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. प्रदीप पाटील यांच्या हॉस्पिटलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले होते. क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के पी खोत, उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर, सचिव गणेश सावंत, संचालक चेतन चव्हाण, माजी सचिव उत्तम फराकटे, माजी खजिनदार विलास रेडेकर यांच्यासह सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.विनय चौगुले व डॉ विजय कुलकर्णी यांनी योगाचे महत्त्व सांगितले. विविध योगासने, प्राणायाम व ध्यान यांचे मार्गदर्शन केले. नियमित योगा करा फिट रहा असा निरोगी जीवनशैलीचा संदेश यावेळी देण्यात आला.यावेळी यावेळी इप्का लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे सर्व उपस्थित सभासदांना मॅटची व नाश्त्याची सोय करण्यात आली होती. क्रिडाई कोल्हापूरचे सचिव गणेश सावंत यांनी आभार मानले.