शिवसेना ठाकरे पक्षाचा ३३ जागांचा प्रस्ताव, काँग्रेस समितीसोबत प्राथमिक चर्चा
schedule14 Dec 25 person by visibility 66 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतंर्गत शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, रविवारी (१४ डिसेंबर २०२५) काँग्रेस समितीसोबत चर्चा झाली. शिवसेनेतर्फे जिल्हाप्रमुख रवीकिरण इंगवले, शहरप्रमुख सुनील मोदी यांनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, ३३ जागांचा प्रस्ताव सादर केला. तसेच महापालिका निवडणूक ही महाविकास आघाडी म्हणून एकसंधपणे लढण्याचे ठरले. इंडिया आघाडीच्या झेंडयाखाली निवडणुकीला सामोरे जाऊ असे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. ‘निवडून येणारा उमेदवार’ ही संकल्पना जागा वाटपाचे समान सूत्र ठेवण्याबद्दल चर्चा झाली. काँग्रेस समितीने डाव्या आघाडीचे कॉम्रेड अतुल दिघे यांनीही काँग्रेस समितीसोबत चर्चा केली.
महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीतील घटक पक्षासोबत चर्चा करण्यासाठी काँग्रेस पक्षाने समिती नेमली आहे. पक्षाच्या अपेक्षा, जागा वाटप, प्रभागनिहाय ताकत या अनुषंगाने चर्चा होत आहे. या समितीमध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, सुर्यकांत पाटील-बुद्धिहाळकर, राजेश लाटकर, आनंद माने, भारती पोवार, विक्रम जरग, तौफिक मुल्लानी, भरत रसाळे यांचा समावेश आहे. समितीने शनिवारी्, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, शेतकरी कामगार पक्ष,आम आदमी पार्टी, भाकप, माकपच्या, पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. रविवारी, काँग्रेस समितीची शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. शिवसेनेकडून त्यांना महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जागा वाटपाचा प्रस्ताव सादर केला.
काँग्रेसची समिती महाविकास आघाडीतील सगळया घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन मंगळवारी, आमदार सतेज पाटील यांना अहवाल सादर करणार आहे. मंगळवारी सायंकाळी महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची पुन्हा बैठक होणार आहे. महापालिकेच्या २० प्रभागातील ८१ जागासाठी निवडणूक होणार आहे.