चित्रकार भाऊसो पाटील यांच्या निसर्गचित्रांचे प्रदर्शन
schedule14 Dec 25 person by visibility 78 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरला लाभलेल्या कला परंपरेचे कलाकार आणि रसिकांना भान आहे. त्यामुळे ही परंपरा अधिकाधिक समृद्ध होत आहे, असे प्रतिपादन पोलीस अधिक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी केले. प्रत्यक्ष जागेवर जाऊ, स्थळ काळाचां प्रत्यक्ष आनंद घेत चित्रित केलेल्या कोल्हापूर स्कूल शैलीतील जलरंगासहित विविध माध्यमातील चित्रकार भाऊसो पाटील यांच्या कलाकृतीच्या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी जिल्हा पोलिस अधीक्षक गुप्ता बोलत होते. दसरा चौकातील शाहू स्मारक भवन येथे आयोजित ' द ब्रशस्ट्रोक लेगसी' या नावांनी निसर्ग चित्र प्रदर्शन आयोजित केले आहे. यावेळी चित्र शिल्पकार संजीव संकपाळ, प्राचार्य अजेय दळवी, विजय टिपुगडे , आर्किटेक्ट शरदचंद्र मोघे, प्रा नानासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. डीवायएसपी डॉ. प्रिया पाटील यांनी केले. अप्पर चिटणीस स्वप्नील पवार यांनी स्वागत केले. रमजान मुल्ला यांनी आभार मानले. हे प्रदर्शन १४ ते २० डिसेंबर २०२५ अखेर सकाळी ९ ते रात्री ८ यावेळेत सर्वांसाठी खुले आहे.