Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
एकीकडे आमदार – खासदार ! दुसरीकडे पैशांचा पाऊस, दूध उत्पादक मात्र आमच्यासोबत ! !  सत्यजीत पाटीलपशुसंवर्धन विभागामार्फत चारा उत्पादन कार्यक्रमकोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा; आमदार राजेश क्षीरसागरांची विधीमंडळात मागणीजिल्ह्यातील ४६ हजारांहून अधिक निरक्षर,  प्रशासनाने ठरविले शंभर टक्के साक्षरतेचे उद्दिष्टटीईटी परीक्षेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ; अधिका-यांनी घेतले केंद्रसंचालकांचे प्रशिक्षणचार्टर्ड अकाउंटंटस कोल्हापूर शाखेतर्फे दोन जुलैला उत्थान-  एमएसएमई महोत्सवएकाच शाळेला दोन कोटी, इतर शाळांसाठी किती निधी ? शिक्षण विभागाच्या असमान निधी वाटपावरुन स्थायी गाजलीमाजी महापौर महादेवराव आडगुळे यांच्या नातवाची आत्महत्यापुरोगामी शिक्षक -समविचारी संघटनेतर्फे सोमवारी धरणे आंदोलनऑनलाइन संचमान्यतेच्या विरोधात घुमला पाच जिल्ह्यातील शिक्षकांचा आवाज, शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर संघटित शक्तीचे दर्शन

जाहिरात

 

एकीकडे आमदार – खासदार ! दुसरीकडे पैशांचा पाऊस, दूध उत्पादक मात्र आमच्यासोबत ! !  सत्यजीत पाटील

schedule24 Jun 26 person by visibility 70 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत एकीकडे आमदार-खासदार, दुसरीकडे पैशांचा पाऊस पडत असताना दूध उत्पादक आमच्या पाठीशी राहिले. हे निश्चितच कौतुकास्पद आहे. गोकुळच्या निवडणुकीत या दूध उत्पादकांच्या हिताचा निर्णय घेऊ. निवडणुकीत कोणासोबत जायचे हे अद्याप ठरलेले नाही.’अशी स्पष्ट भूमिका माजी आमदार सत्यजीत पाटील सरुडकर यांनी मांडली.

 गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी माजी आमदार सत्यजीत पाटील सरुडकर समर्थकांनी बुधवारी, २४ जून रोजी ठराव दाखल केले. जवळपास १५३ ठराव आहेत. हे ठराव दुग्ध विकास विभागाकडे दाखल केले. तत्पूर्वी या उत्पादकांचा कसबेकर हॉलमध्ये मेळावा झाला. सरुडकर गटाला मानणाऱ्या २९ प्राथमिक दूध संस्था अवसायन प्रक्रियेत अडकल्या आहेत. त्या संस्थांना न्याय देण्याची भूमिका आहे असे माजी आमदार सत्यजीत पाटील यांनी सांगितले.

दूध उत्पादकांनी नेहमीच आम्हाला साथ दिली. त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय, निर्णय घेणार नाही. सध्या गोकुळच्या निवडणुकीत एकीकडे आमदार खासदार दिसतात. दुसरीकडे पैशांचा पाऊस पडत आहे. मात्र आमच्याकडील दूध उत्पादक नेहमीच पाठीशी राहिले.कोणत्याही आमिषाला ते बळी पडले नाहीत. यामुळे त्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे. गोकुळची निवडणूक कोणासोबत लढवायची हे अद्याप ठरली नाही. महायुती की महाविकास आघाडीसोबत जायचे हे अजून ठरलेले नाही. गटाला मानणाऱ्या दूध उत्पादकांचा आणखी एक मेळावा काही दिवसांनी घेणार आहोत. दूध उत्पादकांचे हित कोण सांभाळणार हे पाहूनच निर्णय घेतला जाईल.’असे माजी आमदार पाटील यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे माजी सभापती हंबीरराव पाटील उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes