आबिटकर नॉलेज सिटीमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात
schedule27 Jan 26 person by visibility 13 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील पाल येथील आबिटकर नॉलेज सिटीमध्ये संकुलामध्ये देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. भाई आनंदराव आबिटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी पाल गावच्या सरपंच सुशिला गुरव व उपसरपंच दिगंबर देसाई प्रमुख उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष प्रा. अर्जुन आबिटकर म्हणाले ,‘ जिल्हयाचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून आबिटकर नॉलेज सिटीची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेच्या इंजिनीअरींग कॉलेजमधून उत्कृष्ठ इंजिनीअर, कृषी महाविद्यालयातून कृषितज्ञ व अनेक अष्टपैलू खेळाडून बाहेर पडतील.’ यावेळी अंकुश चव्हाण, माजी ग्रामपंचायतसदस्य सर्जेराव मोरे गारगोटी उपसरपंच राहूल चौगले, सागर शिंदे, प्रशांत भोई, सदस्या लता चव्हाण, सरिता राऊत, स्मिता पिसे, मेघा भोसले, संध्या कुपटे, विजय सारंग, सुरेश सुर्यवंशी, चंद्रकांत गाडेकर, दशरथ राऊत उपस्थित होते.कृषी महाविद्यालयच्या प्राचार्या डॉ.दिपाली गोसावी यांनी प्रास्ताविक केले. नंदकुमार निर्मळे यांनी सूत्रसंचालन केले. इंजिनीअरिंग महाविद्यालयाच्या स्मिता मोहोळकर यांनी आभार मानले.