जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुकीतून शिक्षकांना सवलत मिळावी
schedule20 Jan 26 person by visibility 21 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणूक कामातून माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक यांना सवलत मिळावी अशी मागणीचे लेखी निवेदन कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, कोल्हापूर यांच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले.
महाराष्ट्र राज्याच्या महानगरपालिका, नगरपरिषदा यांच्या नुकत्याच पंचवार्षिक निवडणूका पार पडल्या सदर निवडणूक कामकाजात आपल्या जिल्ह्यातील अनेक माध्यमिक शाळांतील शिक्षकांनी आपल्या आदेशानुसार निवडणूक आधिकाऱ्यांना सहकार्य करून अत्यंत चांगल्या पध्दतीने निवडणूका पार पाडल्या. आता निवडणूक विभागाने जिल्हापरिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूका जाहीर केल्या आहेत. त्यासाठी पुन्हा सर्व शिक्षकांना निवडणूक विभागाकडून ऑर्डर्स (आदेश) आल्या आहेत.
दहावी व बारावीच्या परीक्षा जवळ आल्या असून शाळांमध्ये प्रात्यक्षिक परीक्षा व दहावी पूर्व परीक्षा व घटक चाचण्या सुरू आहेत. पुढील आठवड्यात तोंडी परीक्षा सुरू होतील विज्ञान विषयाचे प्रात्यक्षिक पूर्ण करावे लागेल. सध्या हा कालावधी माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असून विद्यार्थ्यांच्या दृष्टीने परीक्षा व मूल्यमापन महत्त्वाचे आहे.
तसेच शिक्षक भरती नसल्याने शाळेत शिक्षक नाहीत आणि त्यातच या निवडणूकीच्या कामकाजासाठी ऑर्डर्स आल्याने प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच विद्याथ्यर्थ्यांच अतोनात नुकसान होत आहे. तरी कृपया यावेळच्या निवडणूक कामकाजासाठी इतर विभागातील लोकांना घ्यावे जेणेकरून विद्याथ्यर्थ्यांचे नुकसान होणार नाही. इतरवेळी आम्ही सार्वत्रिक निवडणूकांमध्ये आपणास सहकार्य केले आहे व यापुढेही करीत राहू पण यावेळेस माध्यमिक शाळांतील शिक्षकांना निवडणूक कामकाजातून वगळावे.
शिष्टमंडळात शिक्षक आमदार जयंत आसगावकर, व्यासपीठ अध्यक्ष एस. डी. लाड, शिक्षक नेते दादासाहेब लाड, मुख्याध्यापक संघ चेअरमन राहुल पवार, सचिव आर. वाय. पाटील, सुधाकर निर्मळे, प्रभाकर हेरवाडे, उदय पाटील, दिपक पाटील, मनोहर जाधव, के के . पाटील, संजय पाथरे, शिवाजी माळकर, काकासाहेब भोकरे, प्रा . सी . एम . गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.