शहीद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे कौलवमध्ये विशेष श्रम संस्कार शिबीर
schedule20 Jan 26 person by visibility 21 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : राधानगरी तालुक्यातील तिटवे येथील शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) हिवाळी कौलव येथे झाले. यामध्ये शंभर विद्यार्थीनीं सहभागी झाल्या होत्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होत ‘शहीद’ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थिनींनी सामाजिक बांधिलकी जोपासत उल्लेखनीय कार्य केले. गावकऱ्यांसाठी स्वच्छता मोहीम, आरोग्य जनजागृती, सेंद्रिय शेतीविषयक उपक्रम आणि साक्षरता अभियान राबवले. कॅम्प समन्वयन प्रा. अविनाश पालकर, प्रा. सुप्रिया पाटील,निकिता पाटील आदींनी केले. राशिवडे बुद्रुक गावचे सरपंच,उपसरपंच, सदस्य आदीनी परिश्रम घेतले.
शिबीर कालावधीत विविध विषयावर व्याख्याने झाली. तसेच विद्यार्थ्यांमधील सोशल मीडिया वापर व त्याचा परिणाम याविषयी सर्वेक्षण केले. राधानगरी तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव यांचे जलसंधारण पर्यावरण संवर्धन व संरक्षण काळाची गरज यावर व्याख्यान झाले. मोफत रक्तगट तपासणी शिबिर झाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पोवार यांचे नैसर्गिक शेती काळाची गरज याविषयी व्याख्यान झाले. महिलांसाठी हळदीकुंकू, फनी गेम्स ,पाककला स्पर्धा घेण्यात आल्या.व्याख्याते संदीप पवार यांनी ‘पाणी आहे तर उद्या आहे उद्या आहे तर जीवन आहे’ यासंबंधी मार्गदर्शन केले. श्री साई ब्लड बँक गारगोटी यांनी रक्तदान शिबीर पार पडले. स्वप्निल पवार यांचे जल व्यवस्थापन जनजागृतीविषयी व्याख्यान झाले. शिबीर यशस्वी होण्यासाठी शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर, कौलव गावचे सरपंच, उपसरपंच व सदस्य, ग्रामसेवक व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.