प्रा. दिनकर कबीर यांना भन्ते नागरत्नजी राज्यस्तरीय पुरस्कार
schedule20 Jan 26 person by visibility 19 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : प्रा. डॉ. दिनकर शेवतांबाई मारुती कबीर यांना युवा बौद्ध धम्म परिषदेत ‘भन्ते नागरत्नजी राज्यस्तरीय’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. हुपरी येथे झालेल्या परिषदेत भन्ते सिरी सारो व अभिनेत्री चिन्मयी सुमित यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले. कबीर हे मूळचे राधानगरी तालुक्यातील कोनोली तर्फ असंडोली येथील आहेत. विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आघाडीवर असतात. प्राध्यापक, प्रकाशक म्हणून काम करतात. त्यांनी वकिलीची पदवी घेतली आहे. जिल्हा सत्र न्यायालयात वकील म्हणून काम करत आहेत. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील वाटचाल व सामाजिक उपक्रमाबद्दल पुरस्कार दिला आहे.