चाळीस हजाराची लाच घेताना नगर अभियंत्याला अटक
schedule19 Jan 26 person by visibility 160 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कागल तालुक्यातील मुरगूड नगरपरिषदेतील नगर अभियंता प्रदिप पांडूरंग देसाईंना (वय ३२ वर्षे) यचाळीस हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. देसाई मूळचे भुदरगड तालुक्यातील मिणचे खुर्द येथील आहेत. त्यांच्याविरोधात काँन्ट्रक्टरनी तक्रार दिली होती.
काँन्ट्रॅक्टरनी हुपरी नगरपरिषद अंतर्गत काम पूर्ण केले होते. त्या कामाचे एमबी रजिस्टर पूर्ण करून देण्याच्या मोबदल्यात, तत्कालीन नगर अभियंता प्रदीप पांडुरंग देसाई यांनी दीड लाख रुपयांची मागणी केली होती. यापूर्वी त्यांनी ५० हजार रुपये घेतलेले आहेत. काँन्ट्रॅक्टरच्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला. नगर अभियंता देसाईने १ लाख ५० हजारांची मागणी केली होती. तडजोडी अंती एक लाख ३० हजार रुपये द्यायचे ठरले. पहिला हप्ता म्हणून ४० हजार मागितले. एमबी रजिस्टर पूर्ण झाल्यावर इतर ४० हजार देण्याचे ठरले होते. त्यानुसार काँन्ट्रक्टरकडून पहिला हप्ता ४० हजार रुपयेची लाच रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने देसाईंना रंगेहाथ पकडले. देसाईच्या निवासस्थानाची झडती घेतली जात आहे. देसाईंच्या विरोधात मुरगूड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हसा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, हेड काँन्स्टेबल सुधीर पाटील, संदीप काशीद, कृष्णा पाटील, प्रशांत दावणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.