पाडळी खुर्दसाठी शिवसेनेकडून सचिन पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल
schedule20 Jan 26 person by visibility 228 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पाडळी खुर्द मतदारसंघातून शिरोली दुमाला येथील लोकनियुक्त सरपंच सचिन विश्वासराव पाटील यांनी सर्वसाधारण गटासाठी शिवसेना (शिंदे गट) पक्षामार्फत उमेदवारी अर्ज दाखल केला. पाटील यांनी कोणताही गाजावाजा न करता साधेपणाने अर्ज दाखल केला.
हा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा करवीरचे प्रांताधिकारी मौसमी चौगले यांच्याकडे शासकीय बहुउद्देशीय हॉल, रमणमळा, कसबा बावडा येथे आवश्यक कागदपत्रांसह सुपूर्द करण्यात आला.यावेळी माजी पंचायत समिती सदस्य सुनील पाटील यांच्यासह सूचक व अनुमोदक उपस्थित होते. सचिन पाटील हे सध्या शिरोली दुमाला ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच म्हणून कार्यरत आहेत. ग्रामपंचायत स्तरावरील कामकाजाचा अनुभव लक्षात घेता, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विविध प्रश्नांवर काम करण्याच्या उद्देशाने त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.