Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
वळसंगला मिळणार सनमडी-घोलेश्वर तलावातून पाणी ! जत तालुक्यातील २९ गावांसाठी स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना !!काँग्रेसकडून तालुकाध्यक्षांच्या निवडी, करवीर, कागल, पन्हाळा, शिरोळचा समावेशडी वाय पाटील कृषी-तंत्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. ए. के. गुप्ताशिवाजी विद्यापीठाच्या प्रकुलगुरुपदी डॉ. ज्योती जाधव ! विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलेला प्रकुलगुरुपदी संधी !!टीईटी सक्तीच्या विरोधात राज्यभरातील शिक्षक संघटनांचा एल्गार, नऊ नोव्हेंबरला शिक्षकांचा मूक मोर्चाजिपसाठी शौमिका महाडिक कोणत्या गटातून लढणार ! नावाभोवती जोडले जाताहेत नवं-नवे मतदारसंघ !!बदलीसाठी बनावटगिरी, २६ शिक्षकांचे प्रमाणपत्र सदोष ! २७ शिक्षकांच्या प्रमाणपत्राची पुणे-मुंबईत पडताळणी !!फुलेवाडीत बांसुरी प्युअर व्हेज रेस्टॉरेंटची दुसरी शाखा, गुरुवारी उद्घाटन ! ऊर्जा संचय तंत्रज्ञानासाठी डी वाय पाटील विद्यापीठाला पेटंटकोल्हापूरच्या कलाकारांची सिनेनिर्मिती, शुक्रवारपासून सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला

जाहिरात

 

टीईटी सक्तीच्या विरोधात राज्यभरातील शिक्षक संघटनांचा एल्गार, नऊ नोव्हेंबरला शिक्षकांचा मूक मोर्चा

schedule30 Oct 25 person by visibility 132 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी :  टीईटी सक्ती करण्याच्या विरोधात शिक्षक संघटनांनी राज्यभर आंदोलन पुकारले आहे. त्या अनुषंगाने ९ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचा मूक मोर्चा निघणार आहे.  महाराष्ट्र राज्य शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी टीईटी परीक्षा आणि 15 मार्च 2024 चा संच मान्यतेच्या  निर्णयाविरोधात राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे.    बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती संघटनेचे राज्याध्यक्ष केशवराव जाधव होते.  बैठकीत २४ नोव्हेंबर २०२५ रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे होणाऱ्या आंदोलनाला मध्यवर्ती संघटनेचा सक्रीय पाठींबाही जाहीर करण्यात आला.
        संघटनेने यापूर्वी चार ऑक्टोबर रोजी होणारा मूक मोर्चा शिक्षणमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी एक ऑक्टोबर रोजी नागपूर बैठकीत दिलेल्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आला होता. मात्र सरकारने अद्याप टी ई टी विरोधात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली नाही व टी ई टी संदर्भात शिक्षकांच्या बाजूने कोणतीही भूमिका न घेतल्याने शिक्षक वर्गामध्ये तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघटनांनी पुन्हा एकत्र येऊन 9 नोव्हेंबर रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर  मूक मोर्चाचे आयोजन केले आहे. तसेच संचमान्यतेचा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करण्यात यावा, शिक्षण सेवक पद कायमचे रद्द करण्यात यावे आणि वस्तीशाळा शिक्षकांची सेवा मूळ रुजू दिनांकापासून ग्राह्य धरावी याही मागण्या करण्यात येणार आहेत..
     या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या ऑनलाईन बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. एक नोव्हेंबर रोजी सर्व जिल्हा पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक होणार असून 2 ते 7 नोव्हेंबर दरम्यान सर्व खासदार, आमदार आणि मंत्र्यांना निवेदन देण्याचे ठरले. जिल्हा बैठकांनंतर पत्रकार परिषद घेऊन शिक्षकांच्या मागण्यांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. तीन नोव्हेंबर रोजी सर्व जिल्हाध्यक्षांच्या सहीचे निवेदन जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला देण्यात येईल. त्यानंतर 3 ते 8 नोव्हेंबर दरम्यान सर्व शाळांमधून जनजागृती मोहिमेद्वारे शिक्षकांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले जाईल. बैठकीस केशवराव जाधव, प्रसाद पाटील, चिंतामण वेखंडे, प्रसाद म्हात्रे, राजेश सुर्वे, सतिश कांबळे, दिगंबर टिपुगडे, साजिद अहमद, सुभाष मस्के, शिवाजी इंगळे, अविनाश भोसले, प्रल्हाद बल्लाळ, भरत मडके, सुरेंद्र गायकवाड उपस्थित होते.
शिक्षक संघ (शिवाजीराव पाटील), महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना, अखिल महाराष्ट्र शिक्षक संघ, शिक्षक परिषद प्राथमिक व माध्यमिक, केंद्र प्रमुख व पदवीधर शिक्षक संघटना, खाजगी प्राथमिक शिक्षक संघटना, शिक्षक सेना, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना, शिक्षक भारती, आदर्श शिक्षक समिती, नगर परिषद व महानगरपालिका शिक्षक संघ, बहुजन शिक्षक महासंघ, प्रहार शिक्षक संघटना, कस्ट्राईब शिक्षक संघटना, महाराष्ट्र जिल्हा परिषद मागासवर्गीय शिक्षक संघटना, आस शिक्षक संघटना, स्वराज्य शिक्षक संघटना, सहकार शिक्षक संघटना, पंजाबराव देशमुख शिक्षक महासंघ, इब्टा शिक्षक संघटना, एकल शिक्षक सेवा मंच, आदिवासी शिक्षक संघटना, स्वाभिमानी शिक्षक संघटना, प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघ प्रोटान, मुंबई शहर व उपनगर माध्यमिक शिक्षक संघ तसेच मुंबई शिक्षक लोकशाही आघाडी टीडीएफ मुंबई यांचा समावेश आहे
.

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes