Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिपसाठी शौमिका महाडिक कोणत्या गटातून लढणार ! नावाभोवती जोडले जाताहेत नवं-नवे मतदारसंघ !!बदलीसाठी बनावटगिरी, २६ शिक्षकांचे प्रमाणपत्र सदोष ! २७ शिक्षकांच्या प्रमाणपत्राची पुणे-मुंबईत पडताळणी !!फुलेवाडीत बांसुरी प्युअर व्हेज रेस्टॉरेंटची दुसरी शाखा, गुरुवारी उद्घाटन ! ऊर्जा संचय तंत्रज्ञानासाठी डी वाय पाटील विद्यापीठाला पेटंटकोल्हापूरच्या कलाकारांची सिनेनिर्मिती, शुक्रवारपासून सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीलात्रिभाषा धोरण निश्चित समिती शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावरडेप्युटी सीईओ अरुण जाधव, शैलेश पाटणकरची होणार संयुक्त चौकशी ? निलंबनानंतर आता विभागीय चौकशीचा ससेमिरा !डॉ. सतीश पत्की यांना डॉ. अतुल जोगळेकर जीवन गौरव पुरस्कारनिवडणुका झाल्यानंतर गोकुळ केसरी कुस्ती स्पर्धा –नविद मुश्रीफकेएमएच्यावतीने दोन दिवसीय केएमकॉन वैद्यकिय परिषद, ७०० प्रतिनिधींचा सहभाग

जाहिरात

 

फुलेवाडीत बांसुरी प्युअर व्हेज रेस्टॉरेंटची दुसरी शाखा, गुरुवारी उद्घाटन !

schedule29 Oct 25 person by visibility 125 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : चटकदार व्हेज डिशेस आणि थाळीच्या माध्यमातून गेल्या १५ वर्षांपासून खवय्यांच्या पसंतीस उतरलेल्या दसरा चौक परिसरातील बांसुरी प्युअर व्हेज रेस्टॉरेंटची दुसरी शाखा फुलेवाडीत सुरू होत आहे. फुलेवाडी दत्त मंदिर नजीक रोजी के. एम. पी. हॉटेलिअर्सचे शाकाहारी "बांसुरी फाईन डाईन" या नूतन रेस्टॉरेंटचे उद्घाटन  गुरुवारी (३० ऑक्टोबर २०२५) सायंकाळी सहा वाजता होत आहे अशी माहिती रेस्टॉरंटचे भागीदार महेश पोवार, विश्वास कळके,  धर्मेश मेहेंदळे, दिपाली पोवार, अनुजा मेहेंदळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते रेस्टारेंटचे उद्घाटन होणार आहे. तसेच हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष सचिन शानभाग, उपाध्यक्ष सिध्दार्थ लाटकर, माजी अध्यक्ष उज्वल नागेशकर, चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने, क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी. खोत आणि भारतीय क्रिकेटपटू  केदार जाधव यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा होत आहे. बांसुरी प्युअर व्हेजमध्ये पंजाबी , महाराष्टीयन, थाळी, तंदूर, चायनीज,कॉन्टिनेन्टल,डेझर्टस अशा पद्धतीचे जेवण ग्राहकांना मिळणार आहे. अत्यंत माफक दरात कोल्हापूरकरांना आणि बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना ए.सी. व ओपन गार्डन मध्ये ही कुटुंबासहीत जेवणाचा स्वाद सोबत आनंदही घेता येणार आहे. तसेच वेगवेगळ्या सांस्कृतिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांना व वाढदिवस आणि एसी हॉलची सुविधा रेस्टॉरंटमध्ये  उपलब्ध आहे. या रेस्टॉरंटमध्ये ए.सी, ओपन गार्डनची सोय, एसी बँक्वेट हॉल,चेंजिग रूम/फीडिंग रूम आदी  सुविधा  उपलब्ध आहेत. हे रेस्टॉरेंट ३१ ऑक्टोबर २०२५ पासून ग्राहकांसाठी खुले होणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes