कोल्हापूरच्या कलाकारांची सिनेनिर्मिती, शुक्रवारपासून सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला
schedule29 Oct 25 person by visibility 54 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : निर्माता, दिग्दर्शक, कार्यकारी निर्माता, कलाकार…सिनेमाची निगडीत सगळी टीम कोल्हापूरची ! या साऱ्या मंडळींनी एकत्र येऊन ‘प्रलय’हा सिनेमा तयार केला आहे. हा सिनेमा ३१ ऑक्टोबर २०२५ पासून प्रदर्शित होत आहे. आतापर्यंत विनोदी अभिनेता म्हणून प्रसिद्धी मिळालेले विजय पाटकर या सिनेमात वेगळया भूमिकेत आहेत. कशीश प्रोडक्शन निर्मित हा सामाजिक विषयावर आधारित हा सिनेमा प्रेक्षकांसाठी वेगळी अनुभूती देणारा आहे असे सिनेमाच्या टीमने सांगितले.
'प्रलय' चित्रपटाचे निर्माते सरदार हिंदूराव आवळे आणि सह-निर्मात्या ज्योती सरदार आवळे आहेत. "जेव्हा जेव्हा सामान्य माणसांवर अत्याचार होतो तेव्हा न्याय मिळवण्याचा प्रयत करताना तो यंत्रणेद्वारे दबला जातो त्याला न्याय मिळत नाही तेव्हा त्यांकडे दोनच पर्याय शिल्लक असतात एक म्हणजे या यंत्रणेच्या दबावाखाली चिरडून मरायच नाही तर उठायचं एक प्रलय बनून..! असाच एक प्रश्न प्रलय चित्रपट आपल्यासमोर घेऊन येतोय..! " असे या सिनेमाचे दिग्दर्शक सचिन तुकाराम वारके यांनी सांगितल.
या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते राहुल नानासाहेब मोरे आहेत. छायाचित्रकार म्हणून अभिषेक शेटे यांनी काम पाहिले. कथा हिरालाल कुराणे यांची आहे. पटकथा-संवाद, गीते आणि नृत्यदिग्दर्शन नंदपुत्र शैलेश राजन शिंदे यांनी केले आहे. बळवंत आतिग्रे यांची गीते आहेत.सिनेमात अभिनेते विजय पाटकर आणि अभिनेत्री शुभांगी गोखले यांच्यासोबत प्रतीक आवळे, अनुराधा धामणे, आदित्य कुंभार, संतोष कसबे, आयुब इंगळीकर, उमेश बोळके, संजय मोहिते, देवेंद्र चौगुले, बाळकृष्ण शिंदे, प्रभाकर वर्तक, तुषार कुडाळकर,सचिन मोरे,शिवाजी पाटील, दीपक खटावकर, विजयन्त शिंदे, पारस सोळंकी, समीर पंडितराव, ओम वेसनेकर यांसारख्या कलाकारांचा दमदार अभिनय प्रेक्षकांना पाहायला मिळेल. विशेष म्हणजे, प्रसिद्ध सेलिब्रिटी सुवर्णा काळे यांचा विशेष सहभा आहे.
तांत्रिक बाजू: चित्रपटाचे नृत्यदिग्दर्शन आदित्य कुंभार आणि नंदपुत्र शैलेश राजन शिंदे यांनी केले आहे. संकलन शेखर गुरव, कला दिग्दर्शन अनुकूल सुतार यांचे आहे. संगीत संयोजन ऐश्वर्य मालगावे यांनी केले आहे. पार्श्वसंगीत शशांक पवार यांनी दिले आहे.ध्वनी संयोजन निलेश निकम यांनी पाहिले आहे. व्हीपीएक्सची जबाबदारी संदीप कांबळे तर पोस्टर डिझाइन राज पाटील यांची आहे. चित्रपटासाठी दादू संकपाळ आणि दीपक खटावकर यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे.