शिवाजी विद्यापीठाच्या प्रकुलगुरुपदी डॉ. ज्योती जाधव ! विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलेला प्रकुलगुरुपदी संधी !!
schedule30 Oct 25 person by visibility 2209 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या प्रकुलगुरुपदी डॉ. ज्योती जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी हे कुलगुरुपदाच्या विशेष अधिकारातंर्गत प्रकुलगुरूसाठी जाधव यांची नियुक्ती केली. दरम्यान कुलगुरुपदासाठी त्यांच्या नावाची शिफारस गुरुवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेत केली. व्यवस्थापन परिषदेनही त्याला संमंती दिली. कुलगुरू गोसावी आणि गुरुवारी (३० ऑक्टोबर २०२५) सायंकाळी डॉ. जाधव यांना प्रकुलगुरुपदी नियुक्ती केल्याविषयी पत्र दिले. तसेच विद्यापीठ प्रशासनाकडून कुलपती कार्यालयाला कळविले.
प्राप्त झाला. डॉ. जाधव या शिवाजी विद्यापीठातील जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख आहेत. तसेच त्यांनी, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या अधिष्ठाता म्हणून काम केले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या गेल्या ६३ वर्षाच्या इतिहासात या विद्यापीठाच्या प्रकुलगुरुपदी पहिल्यांदाच महिलेला संधी मिळाली आहे. दरम्यान शिवाजी विद्यापीठात नियमित कुलगुरु नियुक्त होईपर्यंत त्यांचा प्रकुलगुरुपदाचा कार्यकाल राहणार आहे.
माजी कुलगुरु डी. टी. शिर्के यांचा कुलगुरुपदाचा कार्यकाल सहा ऑक्टोबर २०२५ रोजी संपला. त्या अनुषंगाने तत्कालिन प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील व अन्य चार अधिष्ठाता यांच्या पदाचा कार्यकालही संपुष्टात आला. शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार हा सध्या पुणे येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे आहे. त्यांनी, ११ ऑक्टोबर रोजी प्रभारी कुलगुरुपदाचा कार्यभार स्विकारला.
त्या पाठोपाठ प्रकुलगुरू व चार अधिष्ठाता यांच्या नियुक्तीकडे नजरा लागून होत्या. नूतन प्रकुलगुरु जाधव यांची कारकिर्द शिवाजी विद्यापीठात घडली आहे. रिसर्च, कंत्राटी प्राध्यापक, सिनीअर प्रोफेसर, अधिष्ठाता ते प्र-कुलगुरू असा चढता आलेख आहे. यंग विमेन सायंटिस्ट हा पुरस्कार मिळाला आहे. जागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांत त्यांचा समावेश आहे. शिवाय मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या निवडीच्या अंतिम पाच जणांत त्यांचा समावेश होता. त्या, शिवाजी विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान अधिविभागात गेल्या वीस वर्षाहून अधिक काळ औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया, शुद्धीकरण आणि त्याचे व्यवस्थापन या अनुषंगाने संशोधन केले आहे. विशेष म्हणजे, वस्त्रोद्योग कारखान्यांमधून जी प्रदूषक रंगद्रेव सांडपाण्यात मिसळलेल असतात. त्यांच्यावर प्रक्रिया करुन ते सांडपाणी नैसर्गिक पद्धतीने शुद्ध करण्याच्या दिशेने प्रा. जाधव यांचे संशोधन केंद्रित आहे.