Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिपसाठी शौमिका महाडिक कोणत्या गटातून लढणार ! नावाभोवती जोडले जाताहेत नवं-नवे मतदारसंघ !!बदलीसाठी बनावटगिरी, २६ शिक्षकांचे प्रमाणपत्र सदोष ! २७ शिक्षकांच्या प्रमाणपत्राची पुणे-मुंबईत पडताळणी !!फुलेवाडीत बांसुरी प्युअर व्हेज रेस्टॉरेंटची दुसरी शाखा, गुरुवारी उद्घाटन ! ऊर्जा संचय तंत्रज्ञानासाठी डी वाय पाटील विद्यापीठाला पेटंटकोल्हापूरच्या कलाकारांची सिनेनिर्मिती, शुक्रवारपासून सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीलात्रिभाषा धोरण निश्चित समिती शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावरडेप्युटी सीईओ अरुण जाधव, शैलेश पाटणकरची होणार संयुक्त चौकशी ? निलंबनानंतर आता विभागीय चौकशीचा ससेमिरा !डॉ. सतीश पत्की यांना डॉ. अतुल जोगळेकर जीवन गौरव पुरस्कारनिवडणुका झाल्यानंतर गोकुळ केसरी कुस्ती स्पर्धा –नविद मुश्रीफकेएमएच्यावतीने दोन दिवसीय केएमकॉन वैद्यकिय परिषद, ७०० प्रतिनिधींचा सहभाग

जाहिरात

 

बदलीसाठी बनावटगिरी, २६ शिक्षकांचे प्रमाणपत्र सदोष ! २७ शिक्षकांच्या प्रमाणपत्राची पुणे-मुंबईत पडताळणी !!

schedule29 Oct 25 person by visibility 136 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात आलेल्या शिक्षक बदली प्रक्रियेंतर्गत आजारपण व दिव्यांग असल्याच्या खोटी प्रमाणपत्र पडताळणीमध्ये २६ शिक्षकांचे प्रमाणपत्र सदोष आढळले आहेत. तर २७ शिक्षकांचे प्रमाणपत्र पुढील तपासणीसाठी पुणे व मुंबई येथील रुग्णालयाकडे पाठविली आहेत.

कोल्हापूर जिल्हा परिषदेने बदली संवर्ग एकमधील  शिक्षकांना एक सप्टेंबर २०२५ पासून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे उपस्थित राहून दिव्यांग व आजाराच्या प्रमाणपत्राची पडताळणी करुन घेण्याविषयी कळविले होते. अशा  ३५५ शिक्षकांच्या दिव्यांग व आजाराच्या प्रमाणपत्राच्या पडताळणीचा अहवाल आतापर्यंत प्राप्त झाला आहे. ३५५ पैकी  ३०२ शिक्षकांचे अहवाल बरोबर असल्याचे आढळून आले आहेत. तर २७ शिक्षकांचे प्रमाणपत्र अन्य कारणास्तव व पुढील तपासणीसाठी पुणे व मुंबई येथील रुग्णालयात पाठविले आहेत.

२६ शिक्षकांचे प्रमाणपत्र सदोष आढळले आहेत. त्यापैकी दोघे गैरहजर व कागदपत्र सादर न केलेले दोघे अशा चार शिक्षकांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. तर २२ शिक्षकांच्यावर शासन निर्णयातील तरतुदीनुसार व आवश्यकतेनुसार निलंबन, फौजदारी दाखल करणे व ग्रामविकास विभाग, दिव्यांग विभागास त्यासंबंधी कळविले जाणार आहे. संबंधितांचे यूडीआयडी रद्द करण्याबाबत उपसंचालक आरोग्य विभागास कळविले जाणार आहे. ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णय १८ जून २०२४ अन्वये बदली संवर्ग एकमधील आजाराने त्रस्त शिक्षक, दिव्यांग शिक्षक, दिव्यांग मुलांचे पालक हे बदलीमध्ये प्राधान्य तसेच बदलीतून सूट मिळवण्यासाठी खोटी प्रमाणपत्रे सादर करत असल्यास कारवाई करण्याच्या सूचना आहेत. यासंदर्भातील माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी दिली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes