शिक्षक बँकेचा सभासद हिताचा निर्णय ! कर्जाचा व्याजदर नऊ टक्के !!
schedule06 Jan 26 person by visibility 567 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची आर्थिक शिखर संस्था असलेल्या दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेने सभासद हिताचा निर्णय घेतला आहे. चेअरमन शिवाजी रोडे-पाटील यांनी बँकेच्या सभासदांसाठी "सभासद उत्कर्ष कर्ज" ही योजना जाहीर केली. या कर्जाचा व्याज दर नऊ टक्के असल्याचे जाहीर केले.बँकेच्या इतिहासात प्रथमच ५० लाखांपर्यंतच्या कर्जाचा व्याजदर सर्वात कमी असा फक्त ९ टक्के इतका केला असल्याचे म्हटले आहे.
‘दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि; कोल्हापूरमध्ये राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडीच्या समन्वयातून सभासदांच्या विश्वासावर सत्तेत आल्यावर तीन वर्षात बँकेची आर्थिक घडी यशस्वीरित्या बसवण्यात हे संचालक मंडळ यशस्वी झाले आहे. संचालक मंडळाने खर्चात काटकसर करून सलग तीन वर्षे समाधानकारक लाभांश दिल्यामुळे सभासदांमध्ये बँकेची विश्वासार्हता वाढली आहे. दुर्दम्य इच्छाशक्ती, सकारात्मक विचार, विधायक कृती, काटकसर आणि सभासद हिताचा सहकार या विचारांना प्रमाण मानून केलेल्या सचोटीच्या व प्रामाणिक कारभाराचे हे फलित आहे.’असे चेअरमन रोडे- पाटील यांनी म्हटले आहे.
प्राथमिक शिक्षकांच्या गरजा ओळखून रावबहाददूर डी.आर. भोसले यांनी बँकेची स्थापना १९३९ मध्ये केली. त्या बँकेचा आज वटवृक्ष झाला आहे. त्यांचे उपकार जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्यावर आहेत. त्यांच्या प्रती ऋण व्यक्त करणेच्या अनुषंगाने बँकेच्या कोल्हापूर येथील प्रधान कार्यालयातील सभागृहास बँकेचे संस्थापक कै.राव.डी.आर. भोसले सभागृह" असे नामकरण केले. सभागृह नामकरणाचे औचित्य साधून चेअरमनांनी बँकेच्या इतिहासात प्रथमच ५० लाखांपर्यंतच्या कर्जाचा व्याजदर सर्वात कमी असा फक्त ९ टक्के इतका केला असल्याचे म्हटले आहे.
याप्रसंगी व्हाईस चेअरमन सुरेश कोळी यांनी दिली. याप्रसंगी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी संचालक बाळासाहेब निंचाळकर, अर्जुन पाटील, सुनिल एडके, राजेंद्रकुमार पाटील, बाळकृष्ण हळदकर, एस. व्ही. पाटील, शिवाजी बोलके, रामदास झेंडे, बाबू परीट, नंदकुमार वाईंगडे, अमर वरुटे, गजानन कांबळे, गौतम वर्धन, पद्मजा मेढे, वर्षा केनवडे, तज्ञ संचालक अमोल पाटील, बाबूराव कांबळे व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार मगदूम उपस्थित होते.