राष्ट्रवादीतर्फे जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या इच्छुकांच्या शनिवारी- रविवारी मुलाखती
schedule07 Jan 26 person by visibility 48 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या इच्छुकांच्या तालुकानिहाय मुलाखती दहा व ११ जानेवारी २०२६ या कालावधीत होणार आहेत. कोल्हापुरात शाहू मार्केट यार्ड परिसरात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात या मुलाखती होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर यांनी दिली आहे.
या मुलाखतीवेळी मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार राजेश पाटील, प्रदेश उपाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील- सडोलीकर आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. शनिवारी, दहा जानेवारी रोजी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत करवीर तालुक्यातील इच्छुकांच्या तर अकरा ते साडेअकरा दरम्यान गगनबावडा तालुक्यातील मुलाखती होतील. साडेअकरा ते साडेबारा वाजेपर्यंत पन्हाळा तर दुपारी साडे बारा ते दीड वाजण्याच्या कालावधीत शाहूवाडीमधील इच्छुकांच्या मुलाखती आहेत. दुपारी अडीच ते साडेतीन या कालावधीत हातकणंगले व साडेतीन ते पाच वाजेपर्यंत कागलमधील इच्छुकांच्या मुलाखती असतील.
रविवारी, अकरा जानेवारी रोजी सकाळी नऊ ते साडेदहा या वेळेत राधानगरी तर सकाळी साडे दहा ते साडेअकरा या वेळेत भुदरगड तालुक्यातील मुलाखती होतील. दुपारी साडे अकरा ते साडे बारा दरम्यान आजरा तर दुपारी साडे बारा ते दीड या कालावधीत चंदगड तालुक्यातील मुलाखती आहेत. दुपारी अडीच ते साडे तीन या वेळेत गडहिंग्लज तर साडेतीन ते पाच या वेळेत शिरोळ तालुक्यातील इच्छुकांच्या मुलाखती आहेत.