जनता महायुतीच्या पाठीशी, विजयाचा गुलाल लावणार - सत्यजीत चंद्रकांत जाधव
schedule07 Jan 26 person by visibility 82 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ कोल्हापूर शहराच्या शाश्वत विकासासाठी महायुती सरकार प्रयत्नशील आहे. महायुती सरकारने शहरातील विविध विकासकामांना चालना दिली आहे. यामुळे जनता महायुतीच्या पाठीशी आहे, शंभर टक्के विजयाचा गुलाल लावणार. प्रभागातील लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.’ असा विश्वास प्रभाग क्रमांक ११ मधील महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार सत्यजीत चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केला.
महायुतीच्या उमदेवारांनी, विविध भागात संयुक्तपणे प्रचारफेरी काढली. शिवसेनेचे उमेदवार सत्यजीत जाधव, भाजपाच्या उमेदवार माधुरी नकाते, निलांबरी साळोखे, राष्ट्रवादीच्या उमेदवार यशोदा मोहिते यांनी वारेवसाहतसह अन्य भागात प्रचारफेरी काढली. याप्रसंगी बोलताना उमेदवार जाधव यांनी ‘प्रभागात महायुतीच्या उमेदवारांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. शंभर टक्के विजयाचा गुलाल लावणार.’असा विश्वास व्यक्त केला. उमेदवारांनी, घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. दरम्यान महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ डॉ. दश्मिता सत्यजीत जाधव यांनी टिंबर मार्केट, लाड चौक या भागात प्रचारफेरी काढली.‘ कोण म्हणतय येत नाही, आल्याशिवाय राहत नाही, सत्यजित जाधव तुम् आगे बढो हम तुम्हारे साथ है’अशा घोषणा देत प्रचार फेरी विविध भागातून निघाली. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सिद्धाळा गार्डन, टिंबर मार्केट, पद्मावती गार्डन येथे आयोजित प्रचारफेरीत महिला मतदारांची संख्या लक्षणीय होती. या प्रसंगी सचिन पाटील, श्रीकांत मंडलिक, विकास शिरगावे, धीरज गायकवाड, योगेश घाडगे, अविनाश कामटे राजू पाटील, पिंटू कांदेकर आदी उपस्थित होते.