जलतरण तलाव सरकारी, मात्र निधीचे वावडे का ? कृती समितीची पालकमंत्र्यांना विचारणा
schedule20 Jun 24 person by visibility 426 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पालकमंत्री हसन मुश्रीफ व जिल्हा नियोजन समितीला छत्रपती शिवाजी स्टेडियममधील जलतरण तलावातील सुविधा व देखभालीचे वावडे आहे का ? असा सवाल कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समिती स्विमिंग हब फाउंडेशन कोल्हापूरने केला आहे.
पत्रकात म्हटले आहे, “कोल्हापूर जिल्ह्यात शासकीय विकास योजनांच्या कोट्यवधी रुपयांच्या घोषणांचा पाऊस पडत आहे, ही बाब स्वागतार्हआहे. कोल्हापुरातील सरकारी स्टेडियम म्हणून शिवाजी स्टेडियम ओळखले जाते. येथील जलतरण तलावात जलतरणाचा सराव करुन कित्येक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मुले मुली, खेळाडू म्हणून तयार होऊन त्यांनी नावलौकिक उंचावला आहे. असंख्य खेळाडू या ठिकाणी सराव करत असतात.
नजीकच्या स्टेडियमसाठी दीड दोन कोटी रुपयांचा निधी दुरुस्तीसाठी मिळाला, पण जलतरण तलावासाठी निधी देता येत नाही म्हणजे पालकमंत्री व राज्य नियोजन मंडळास या जलतरण तलावाची वावडे आहे काय ? असा सवालही केला आहे.
खेळाडू व सामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी जलतरण तलावास पालकमंत्री व राज्य नियोजन मंडळांनी या तलावासाठी निधी देऊन सुविधा उपलब्ध कराव्यात असे म्ह्टले आहे. कृती समितीचे रमेश मोरे, अशोक पोवार, उमेश कडोलीकर, समीर चौगुले, अभिजीत कपडेकर, निलेश जाधव, प्रकाश आमते, राजाभाऊ मालेकर, लहुजी शिंदे, महादेवराव जाधव, चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या नावांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.