कसबा वाळवे येथील दारू दुकान परवाना निलंबित करा
schedule20 Jun 24 person by visibility 347 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील देशी दारू दुकान परवाना निलंबित करा, अशी मागणी दिलीप इंगवले यांनी पत्रकार परिषदेत केली. परवाना देताना प्रशासनाने संगणमत केल्याचा आरोप यांनी केला. राधानगरी तालुक्यातील येथील देशी दारू दुकान संजय मारुती इंगवले यांनी खोटी कागदपत्रे तयार करून दारू दुकानांचे लायसन हडप केले आहे. इंगवले यांच्यावर राधानगरी पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे .तरीही राज्य उत्पादन शुल्क विभागातील काही अधिकारी इंगवले यांच्या पाठीशी राहतात असा आरोप दिलीप इंगवले यांनी केला. कसबा वाळवे येथील देशी दारू दुकान रामचंद्र कृष्णाजी इंगवले यांच्या नावे होते. रामचंद्र यांचा मुलगा संजय इंगवले हा चुलते मारुती कृष्णाजी इंगवले यांना दत्तक गेला आहे. तरीही संजय इंगवले यांनी रामचंद्र इंगवले यांचा मुलगा असलेला भासवून त्यांचाच वारस असल्याची कागदपत्रे तयार करून राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे कागदपत्रे सादर केली आहेत .संजय इंगवले यांचा खोटा दस्तावेज असतानाही राज्य उत्पादन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अंधारात ठेवून संजय इंगवले यांच्या परवान्यावर स्वाक्षरी दिली आहे, असा आरोपी त्यांनी केला. परवाना देताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी राजपत्रांमधील टंकलिखित मजकुराखाली काही मजकूर हस्तलिखित साध्या पेनाने लिहून हे राजपत्र राज्यपालांच्या आदेशाने असल्याचे भासवलेले आहे. त्यामुळे सरकारची फसवणूक झाली असून त्याची चौकशी व्हावी अशी मागणी ही त्यांनी केली.