आरपीआय गवई गटाचा महाविकास आघाडीला पाठिंबा! प्रा. जयंत आसगावकर, हर्षदा देशमुखांनाना दिले पाठिंब्याचे पत्र!!
schedule12 Oct 26 person by visibility 26 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, गवई गट कोल्हापूर जिल्ह्याने पुणे विभागीय शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला. शिक्षक मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांची भेट घेऊन त्यांना पाठिंब्याचे पत्र दिले. तसेच पदवीधर मतदारसंघातील उमेदवार हर्षदा देशमुख जाधव यांनाही पाठिंबा जाहीर केला. आरपीआय गवई गटाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पांडूरंग कांबळे, जिल्हा सरचिटणीस भीमराव कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष सागर कांबळे, राधानगरी तालुकाध्यक्ष प्रकाश सिरसेकर, युवा कार्याध्यक्ष सौरभ निगवेकर, रविंद्र कांबळे यांनी प्रा. आसगावकर यांची सोमवारी, (१२ ऑक्टोबर २०२६) कोल्हापुरात भेट घेतली. त्यांच्याकडे पाठिंब्याचे पत्र दिले.शिक्षकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रा. आसगावकर हे सातत्याने प्रयत्नशील आहेत. यामुळे त्यांना पाठिंबा देत असल्याचे म्हटले आहे.