आमदार फंडातील शंभर टक्के निधी आसगावकरांनी शाळांसाठी खर्च केला, नावातच जयंत असल्यामुळे पराभव अशक्य : राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील
schedule11 Oct 26 person by visibility 58 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : ' शिक्षक आमदार म्हणून प्रा. जयंत आसगावकर यांनी गेल्या सहा वर्षांमध्ये शाळा व शिक्षकांना न्याय देण्याची भूमिका पार पाडली. शिक्षणाची निगडित विविध विषय त्यांनी सभागृहात प्रभावीपणे मांडले. त्यांच्या नावातच जयंत आहे. यामुळे त्यांचा पराभव करणे अवघड आहे' असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला
पुणे विभागीय शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या प्रचारार्थ रविवारी 11 ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात प्रचार मेळावा आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे ळ, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, राजूबाबा आवळे, राजीव आवळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काँग्रेस कमिटी कार्यालयातील सभागृहात हा मेळावा झाला. या प्रचार मेळाव्यात सर्वच नेत्यांनी शिक्षक मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार व विद्यमान आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर यांच्या गेल्या सहा वर्षातील कामगिरीचे कौतुक केले. आमदार फंडातील शंभर टक्के निधी शाळा व शिक्षणासाठी खर्च केलेला एकमेव आमदार अशा शब्दांत त्यांचा गौरव झाला. आमदार जयंत पाटील म्हणाले, ' केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या शैक्षणिक धोरणामुळे तरुणाई , पदवीधर व शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. सरकार चुकीच्या पद्धतीने आंदोलने चिरडत आहे. सरकारच्या विरोधात विद्यार्थी वर्ग रस्त्यावर उतरला आहे. त्यामुळे समाजातील सर्व घटकांचा आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. आज शिक्षण, शाळा, शिक्षक पदवीधर यांच्यासमोर विविध प्रश्न आहेत. त्या प्रश्नावर प्रभावीपणे काम करण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन आमदार जयंत पाटील यांनी केले. तसेच त्यांनी पदवीधर, शिक्षकांच्या प्रश्नावर महायुती व महाविकास आघाडीतील उमेदवारमध्ये शनिवार वाड्यासमोर खुली चर्चा होऊ दे. महाविकास आघाडीचे उमेदवार अभ्यासू आहेत की महायुतचे उमेदवार हे लोकांना कळेल अशा शब्दात खुले आव्हान दिले.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले,' केंद्र व राज्यातील सरकार विरोधात असंतोष वाढत आहे. राज्य आणि दिल्लीतील सरकारचे तख्त उलथवून टाकण्याची सुरुवात सुरुवात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील निवडणुकीपासून कोल्हापुरातून होईल.शिक्षक पदवीधरसह गोकुळच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजयाचा गुलाल दिसेल.' आमदार सतेज पाटील म्हणाले," पुणे विभागीय शिक्षक मतदार संघातील पाचही जिल्ह्यामध्ये गेल्या सहा वर्षात प्रत्येक शाळेत शैक्षणिक साहित्य पुरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमदार जयंत आसगावकर यांनी केला आमदार फंडातील शंभर टक्के निधी त्यांनी शाळा आणि शिक्षणासाठी खर्च केला. प्रत्येक शाळेला प्रिंटर स्मार्ट बोर्ड दिले. त्यांच्या कामाची शिदोरी हीच त्यांना विजयापर्यंत पोहोचवेल. शिक्षक मतदारसंघातील निवडणूक लढवण्यासाठी तीस वर्षे पूर्ण असावे लागतात. महायुतीच्या उमेदवाराचे वय 3 ऑक्टोबर रोजी तीस वर्षे पूर्ण झाले . यावरून त्यांचा अनुभव फारसा नाही हे स्पष्ट होते. यामुळे त्यांच्यावर मी जास्त बोलणार नाही " माजी आमदार मालोजीराजे छत्रपती म्हणाले, शिक्षकांनी सहा वर्षांपूर्वी ज्या विश्वासाने निवडून दिले त्या विश्वासास पात्र राहण्याचे काम आमदार आसगावकर यांनी प्रामाणिकपणे पार पाडले. प्रशासकीय पातळीवर व सभागृहात अतिशय उत्तमरित्या शिक्षकांच्या प्रश्नांना वाचा फोडली' याप्रसंगी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, सारंग पाटील, शिवाजी खांडेकर, संदीप मानगावे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते मेहबूब शेख, प्राचार्य टी एस पाटील, कॉम्रेड दिलीप पवार, उदय नारकर यांची भाषणे झाली. शिक्षक नेते भरत रसाळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा निशांत गोंधळे यांनी सूत्रसंचालन केले. काँग्रेस पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय समन्वयक समीर मोहिते यांनी आभार मानले. याप्रसंगी व्यासपीठावर काँग्रेसच्या महिला पदाधिकारी सरला पाटील, शशांक बावचकर, शेतकरी कामगार पक्षाचे बाबुराव कदम, महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते इंद्रजीत बोंद्रे, शहराध्यक्ष प्रवीण केसरकर, राज्य कर्मचारी संघटनेचे अनिल लवेकर, प्राचार्य प्रभाकर हेरवाडे, विनोद उत्तेकरी ,शिवाजी कोरवी, सतीश कांबळे , अनिल घाटगे, तौफिक मुलाणी आदी उपस्थित होते