+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust.लोहिया हायस्कूलची राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत धडक adjust कुलगुरू डॉ.के.प्रथापन यांचा अवॉर्ड ऑफ ऑनरने गौरव adjustराजाराम कारखान्याच्या वार्षिक सभेत सर्व प्रश्नांची उत्तरे देणार - अमल महाडिक adjustकोल्हापुरात निघणार २५ हजार शिक्षक-कर्मचाऱ्यांचा मोर्चा! आंदोलनात पालकांचाह सहभाग !! adjust पर्यटन व्हिलेज स्पर्धेत पाटगावला राष्ट्रीय स्तरावर कांस्यपदक adjustचांदेकरवाडीच्या कुस्ती मैदानात सुभाष निऊंगरेचा प्रेक्षणीय विजय adjustशेतकरी संघ बचावासाठी धडक मोर्चा ! पालकमंत्री- जिल्हाधिकाऱ्यांचा निषेध !! adjust चेतन नरकेंची मलेशियातील ग्लोबल सीएफओ समिटमध्ये निवड adjustसासूबाई जोरातमध्ये उलगडणार सासू-जावयाची धमाल गोष्ट adjustवीरशैव बँकेला चार कोटी ७१ लाखाचा नफा, सभासदांना दहा टक्के लाभांश
Screenshot_20230905_091804~2
Screenshot_20230903_122011~2
schedule30 May 23 person by visibility 95 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त रविवारी (चार जून २०२३ ) कोल्हापूर शहरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे अशी माहिती मल्हार सेनेचे बबनराव रानगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ प्रणित मल्हार सेना व युवक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रम होत आहेत. मंगळवारी (ता.३० मे) सरकारी कार्यालयात अहिल्यादेवींच्या प्रतिमा लावल्या जाणार आहेत. बुधवारी (३१ मे) वाशी नाका येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकामध्ये जयंती सोहळा होणार आहे. तर रविवारी सायंकाळी पाच वाजता मिरजकर तिकटी येथून मिरवणुकीला प्रारंभ होईल.
मिरवणुकीत धनगरी ढोल, कैताळाचे २०० लोकांचे पथक, गजनृत्य, महिला लेझीम पथक, मर्दानी खेळ, हलगी वादक यांचा सहभाग असणार आहे. अहिल्यादेवींच्या जीवनावरील फलक व चित्ररथ मिरवणुकीत असतील. महिला व पुरुष पिवळे फेटे, पिवळे झेंडे घेऊन मिरवणुकीत सहभागी होतील. तर अकरा जूनला अकरा महिलांना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देण्यात येणार आहेत.
पत्रकार परिषदेला गोकुळचे संचालक बयाजी शेळके, राघू हजारे, छगन नांगरे, बाबूराव बोडके, दत्ता बोडके, शामराव माने, आनंदा धनगर, हेमंत बोडके, बबलू फाले आदी उपस्थित होते.