Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात महापालिका शाळेत साकारली स्मार्ट हॅपी क्लासरुममहाराणी ताराराणी पुरस्कार मेजर स्वाती संतोष महाडिकांना जाहीरमहावीर उद्यानात सहा- सात डिसेंबरला पुष्पप्रदर्शनराष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या राष्ट्रीय सचिवपदी बाजीराव खाडेगोकुळमध्ये आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन साजराकोल्हापुरात डेप्युटी सीईओ, बीडीओसह २९ अधिकारी सामूहिक रजेवरलिंगायत माळी समाजाचे पुरस्कार जाहीर ! एस. एम. माळींना जीवनगौरव, अशोक राजाराम माळींना समाजभूषण पुरस्कार ! !दिव्यांग दिन ठरला अनोखा, अंध शिक्षिका दिपाली पाटीलला नियुकतीचे पत्रशाळा बंद आंदोलनातील शिक्षक – कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात : शिक्ष्ण संचालकांचा आदेशमतदार कोल्हापूरचे, नाव पुणे-बार्शीच्या मतदार यादीत, हा घोळ कधी सुधारणार ? : आदिल फरासांचा प्रशासनाला सवाल

जाहिरात

 

एलिमेंट्री टीचर्स ऑर्गनायझेशन्सiच्या राष्ट्रीय महासचिवपदी सुधाकर सावंत

schedule11 Feb 25 person by visibility 441 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे नगरपालिका महानगरपालिका राज्यप्रमुख सुधाकर सावंत यांची राष्ट्रीय पातळीवरील प्राथमिक शिक्षकांची संघटना ऑल इंडिया फेडरेशन ऑफ एलिमेंट्री टीचर्स ऑर्गनायझेशन्सiच्या राष्ट्रीय महासचिवपदी  निवड झाली. पाटणा येथे नुकत्याच झालेल्या सातव्या राष्ट्रीय संमेलनामध्ये ही निवड झाली. 
 सावंत हे तीस वर्षाहून अधिक काळ शिक्षक -कर्मचारी चळवळीत कार्यरत आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेत झालेल्या शिक्षक भरती प्रकरणी झालेल्या आंदोलनातून नेतृत्वाची सुरुवात झाली. शिक्षक समितीचे  राष्ट्रीय अध्यक्ष प्रभाकर आरडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला. शिक्षक समिती कोल्हापूर शहर चे सरचिटणीस व अध्यक्ष म्हणून काम केले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याचे कार्यालयीन चिटणीस, राज्यउपाध्यक्ष म्हणून काम पाहिले. सध्या नगरपालिका महानगरपालिका प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. राज्य सरकारी , निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समिती, कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ यांनी वेळोवेळी पुकारलेल्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला, त्याचबरोबर अनेक आंदोलनाचे नेतृत्वही करण्यात आघाडीवर होते. 
           शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी, मागण्यासाठी तसेच शिक्षण हक्क कायदा अस्तित्व यावा यासाठी नागपूर, मुंबई, दिल्ली पुणे भोपाळ व गोवा या ठिकाणी झालेल्या अनेक आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला, या निवडीसाठी राष्ट्रीय अध्यक्ष प्रभाकर आरडे, राष्ट्रीय उपाध्यक्ष बाबूलाल झा (झारखंड) राष्ट्रीय सचिव व्ही. अण्णामलाई (तामिळनाडू) सालिकराम पटेल (उत्तर प्रदेश) सुरेंद्र सौरभ (बिहार) के. नरसिंह रेड्डी (आंध्र प्रदेश) हरीमंदर पांडे (उत्तर प्रदेश) आदींचे सहकार्य लाभले. अशी माहिती शहराध्यक्ष संजय पाटील यांनी दिली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes